“देवाच्या कृपेने मी तुमच्यासमोर उभा…” ; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

Donald Trump Speech । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच जनसमुदायाला संबोधित केले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपण दणदणीत विजय मिळवू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी मिलवॉकी, विस्कॉन्सिन याठिकाणी रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात भाग घेतला. यावेळी त्यांनी अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली. तसेच राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जनसमुदायाला संबोधित करताना, “आजपासून चार महिन्यांनंतर आम्हाला मोठा विजय मिळेल.” त्यांनी वचन दिले की ते केवळ अर्ध्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण अमेरिकेसाठी अध्यक्ष असतील. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ट्रम्प यांनी राष्ट्रीय अधिवेशनात त्या भीतीदायक क्षणाबद्दल बोलले. ते म्हणाले की, आजूबाजूला रक्त वाहत होतं, पण कुठेतरी मला सुरक्षित वाटत होतं कारण देव माझ्या पाठीशी होता.” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या थॉमस मॅथ्यूज क्रुक्सला गुप्तहेर खात्याने जागीच ठार केला.
देवाच्या कृपेने मी तुमच्यासमोर उभा Donald Trump Speech ।
पुढे बोलताना माजी राष्ट्रपती म्हणाले, “जर मी शेवटच्या क्षणी मान हलवली नसती, तर मारेकऱ्याची गोळी निशाण्यावरच लागली असती आणि आज रात्री मी तुमच्यासोबत नसतो.” असे त्यांनी म्हटले. तसेच “आज मी याठिकाणी तुमच्या समोर फक्त सर्वशक्तिमान देवाच्या कृपेने उभा आहे. अनेक लोक म्हणतात की, आम्ही या आठवड्याच्या परिषदेत दैवी हस्तक्षेपाविषयी ऐकले, हा तोच महत्वपूर्ण क्षण होता. असे त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी सीक्रेट सर्व्हिस एजंट्सचे आभार मानले Donald Trump Speech ।
ट्रम्प म्हणाले की, “मी अर्ध्या अमेरिकेचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकेचा अध्यक्ष होण्यासाठी धावत आहे, कारण अर्धी अमेरिका जिंकण्यात विजय नाही.” माजी राष्ट्रपतींनी सीक्रेट सर्व्हिस एजंट्सचे आभार मानले, जे लगेच मंचावर आले. त्यांनी एजंट्सचे वर्णन अद्भुत लोक म्हणून केले. ज्यांनी एक मोठा धोका पत्करला आणि त्यांचे प्राण वाचवले. ट्रम्प म्हणाले, “आज रात्री, आत्मविश्वास आणि निष्ठेने, मी अभिमानाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी तुमची नामांकन स्वीकारतो.”असे त्यांनी यावेळी म्हटले.





