Donald Trump on Zohran Mamdani। अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीवरून सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एवढेच नाही तर त्यांनी ममदानी यांना कम्युनिस्ट वेडे आणि धोकादायक व्यक्ती म्हटले आहे. ट्रम्प यांनी,”जर ममदानी महापौर झाले तर ते न्यू यॉर्क उद्ध्वस्त करतील.”असा मोठा दावा देखील त्यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून, मी या कम्युनिस्ट वेड्याला न्यूयॉर्क उद्ध्वस्त करू देणार नाही. माझ्याकडे सर्व अधिकार आणि पर्याय आहेत. मी न्यूयॉर्क शहर वाचवीन आणि ते पुन्हा ‘महान’ बनवीन, जसे मी जुन्या अमेरिकेत केले होते.’असे म्हटले आहे. नागरिकत्व काढून घेण्याची धमकी – ममदानी Donald Trump on Zohran Mamdani। ममदानी यांनीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ममदानी म्हणाले, ‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मला अटक करण्याची, माझे नागरिकत्व काढून घेण्याची, मला डिटेंशन कॅम्पमध्ये टाकण्याची आणि मला हद्दपार करण्याची धमकी दिली आहे. मी कोणताही कायदा मोडला आहे म्हणून नाही, तर मी आयसीईला आमच्या शहरात दहशत पसरवू देणार नाही म्हणून. ” असे म्हटले आहे. तसेच ममदानी म्हणाले, “त्यांची विधाने केवळ आपल्या लोकशाहीवर हल्ला नाहीत तर त्यांच्या सावलीत लपण्यास नकार देणाऱ्या प्रत्येक न्यूयॉर्करला संदेश देण्याचा प्रयत्न आहेत. जर तुम्ही बोललात तर ते तुमच्या मागे येतील.” जोहरान ममदानी कोण आहे? Donald Trump on Zohran Mamdani। महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक उमेदवार बनलेले ममदानी नोव्हेंबरमध्ये निवडून आले तर ते न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर असतील. गेल्या महिन्यात न्यू यॉर्कच्या महापौरपदाच्या प्राथमिक निवडणुकीत ममदानी यांनी माजी महापौर अँड्र्यू कुओमो यांना ३३ वर्षे पराभूत केले. ३३ वर्षीय ममदानी सध्या न्यूयॉर्क राज्य विधानसभेत आमदार आहेत आणि स्वतःला लोकशाही समाजवादी म्हणून वर्णन करतात. जोहरानचा जन्म १९९१ मध्ये युगांडाची राजधानी कंपाला येथे झाला. त्याचे वडील कोलंबिया विद्यापीठात एक प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. जोहरानच्या वडिलांचे नाव मोहम्मद ममदानी होते तर त्याची आई भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर आहे. जोहरान ममदानीचे वडील केप टाउन विद्यापीठात प्राध्यापक होते. २०१८ मध्ये जोहरान ममदानीला अमेरिकन नागरिकत्व मिळाले.