Donald Trump on Venezuela। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाबद्दल एक मोठी घोषणा केली. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर घोषणा करत व्हेनेझुएलाचे अंतरिम सरकार अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल उच्च दर्जाच्या तेलाची विक्री करणार असल्याचे म्हटले. तसेच ट्रम्प यांच्या मते, “अमेरिकेला हे तेल बाजारभावाने मिळेल” डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी बोलताना, “तेल विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचे नियंत्रण राहील आणि हे उत्पन्न दोन्ही देशांच्या लोकांच्या हितासाठी वापरले जाईल”असे त्यांनी म्हटले. त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी ऊर्जा सचिव क्रिस राईट यांना ही योजना त्वरित अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. हे तेल स्टोरेज जहाजांद्वारे थेट अमेरिकेच्या अनलोडिंग डॉक आणि बंदरांमध्ये नेले जाणार आहे. व्हाईट हाऊसने जारी केले निवेदन Donald Trump on Venezuela। दरम्यान, व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे की व्हेनेझुएलाच्या तेल व्यापाराबाबत शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. एक्सॉन, शेवरॉन आणि कोनोकोफिलिप्स सारख्या प्रमुख अमेरिकन तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत व्हेनेझुएलाच्या तेल करारावर आणि भविष्यातील रणनीतीवर तपशीलवार चर्चा होण्याची अपेक्षा आहे. व्हेनेझुएलाकडे तेलाचे साठे Donald Trump on Venezuela। व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठे कच्च्या तेलाचे साठे आहेत, परंतु असे असूनही, ते दररोज सरासरी फक्त १ दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन करते. ऑक्टोबरमध्ये दररोज सरासरी १३.९ दशलक्ष बॅरल उत्पादन करणाऱ्या अमेरिकेच्या तुलनेत. ट्रम्पच्या योजनेनुसार, जर अमेरिकेने अंदाजे ५६ डॉलर्समध्ये एक बॅरल तेल खरेदी केले तर व्हेनेझुएलाचे तेल अंदाजे २.८ अब्ज डॉलर्सचे होईल.