“भारताकडे खूप पैसा, आम्ही दरवर्षी पैसे का द्यायचे?” ; भारतीय मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या निधीवर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

Donald Trump on USAID Fund। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पदभार स्वीकारल्यापासून जगाला धडकी भरवणारे निर्णय घेतले आहेत. त्यात इतर देशाच्या टॅक्सचा मुद्दा असो व अमेरिकेतील स्थलांतरितांचा प्रश्न असो या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आपली कठोर भूमिका जगासमोर मांडली आहे. आता त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात आणखी एक निर्णय घेतला आहे. भारतातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अमेरिकेकडून देण्यात येणारा २० दशलक्ष डॉलर्सचा निधी थांबवण्याच्या DOGE विभागाच्या निर्णयाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले. भारतासारख्या देशाला अशी मदत देण्याची गरज का आहे यावर त्यांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच माध्यमांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी भारतीय मतदारांना प्रभावित करण्यासाठी जो पैसा खर्च केला जातो तो निधी आता थांबवण्यात आला आहे. त्यावरच विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी, “आम्ही भारताला दोन कोटी डॉलर्स का द्यायचे? त्याच्याकडे खूप पैसे आहेत. ते जगातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे दरही खूप जास्त आहेत. मला भारताबद्दल आणि त्याच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे पण मतदारांच्या मतदानासाठी २० दशलक्ष डॉलर्स का द्यावे? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
१६ फेब्रुवारी रोजी, एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील DOGE ने विविध देशांचा निधी थांबवण्याची घोषणा केली होती, ज्यामध्ये भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर्सची रक्कम देखील समाविष्ट होती. DOGE ने याविषयी माहिती देताना,”अमेरिकेने भारतात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी तयार केलेल्या $20 दशलक्ष कार्यक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ” असे म्हटले आहे. भारताच्या वाढीव शुल्काबाबत ट्रम्प यांनी अनेक वेळा विधाने केल्याचे ज्ञात आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत अशा देशांमध्ये आहे जिथे सर्वाधिक शुल्क आहे.
#WATCH | US President Donald Trump says, “Why are we giving $21 million to India? They have a lot more money. They are one of the highest taxing countries in the world in terms of us; we can hardly get in there because their tariffs are so high. I have a lot of respect for India… pic.twitter.com/W26OEGEejT
— ANI (@ANI) February 18, 2025
उच्च दरांमुळे भारतातील अमेरिकन उद्योगाच्या भवितव्यावर परिणाम Donald Trump on USAID Fund।
मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी पैशाच्या वापराबद्दल अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की त्यांना वाटते की अमेरिकन निवडणुकीत ५०० दशलक्ष डॉलर्सचा वापर करण्यात आला. याठिकाणच्या मतदारांचा उत्साह याचा पुरावा आहे आणि भारतात पैसे पाठवण्याची चर्चा आश्चर्यकारक आहे असे त्यांना वाटते. या टिप्पणीसोबतच ट्रम्प यांनी टॅरिफबाबत एक विधानही केले. भारतातील अमेरिकन उद्योगाच्या संभाव्यतेबद्दल ते म्हणाले, “आम्ही तिथे प्रवेश करू शकत नाही कारण त्यांचे शुल्क खूप जास्त आहे.”
DOGE म्हणजे काय? Donald Trump on USAID Fund।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये DOGE म्हणजे काय? आणि ट्रम्पच्या नवीन विभागाचे नाव कुठून आले? खरंतर डोगेकॉइन ही एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. ती २०१३ मध्ये तयार करण्यात आली होती. डोगेकॉइन २०१३ मध्ये बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी लाँच केले होते. त्यात शिबा इनू कुत्र्याचा फोटो आहे.
मनोरंजक गोष्ट अशी आहे की डोगेकॉइन बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीची खिल्ली उडवण्यासाठी तयार करण्यात आले होते, परंतु ही क्रिप्टोकरन्सी २०२१ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली. ती प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण देखील एलोन मस्क होते. त्याने या चलनाबद्दल ट्विट करायला सुरुवात केली आणि लोक त्याकडे लक्ष देऊ लागले. डोगेकॉइनच्या लोगोला डोगे असे म्हणतात. त्याचे मीम्स व्हायरल झाल्यानंतर, क्रिप्टोकरन्सी समुदायातील लोकांनी त्यात रस दाखवायला सुरुवात केली.





