डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा लादला २५% टॅरिफ ; कधीपासून लागू होणार नवीन टॅरिफ ? जाणून घ्या

Donald Trump on Tariff। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नवीन घोषणा करत जगाला आणखी एक धक्का दिला आहे. १ नोव्हेंबर २०२५ पासून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व मध्यम आणि अवजड ट्रकवर २५% कर लादला जाणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा निर्णय अमेरिकन ट्रक उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयीचे एक पोस्ट करत ही माहिती दिली. यामध्ये त्यांनी,”१ नोव्हेंबर २०२५ पासून इतर देशांमधून आयात होणाऱ्या सर्व मध्यम आणि अवजड ट्रकवर २५% कर लादला जाईल.”असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन कंपन्या आणि कामगारांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले, “आम्ही आमच्या उद्योगांना परदेशी डंपिंग आणि अन्याय्य व्यापार धोरणांमुळे नुकसान होऊ देणार नाही.”
कोणत्या देशांवर परिणाम होईल? Donald Trump on Tariff।
* या निर्णयाचा परिणाम मेक्सिको, कॅनडा, जपान, जर्मनी आणि फिनलंडसह अनेक देशांवर होणार आहे.
* मेक्सिको हा अमेरिकेला मध्यम आणि अवजड ट्रकचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. २०१९ पासून, मेक्सिकोची ट्रक निर्यात तिप्पट वाढून अंदाजे ३.४ लाख युनिट्स झाली आहे.
* अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्यातील USMCA करारानुसार, ट्रक सध्या शुल्कमुक्त आयात केले जाऊ शकतात, जर त्यांच्या किमतीच्या ६४% उत्तर अमेरिकेतून आल्या तर. नवीन शुल्कांचा या व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
कंपन्यांवर परिणाम
* स्टेलॅन्टिस (‘रॅम’ ब्रँड ट्रक आणि व्हॅन बनवणारी) आता मेक्सिकोमध्ये उत्पादित ट्रकसाठी जास्त खर्च येऊ शकते.
* स्वीडिश कंपनी व्होल्वो ग्रुप, मेक्सिकोमधील मोंटेरी याठिकाणी ७०० दशलक्ष डॉलर्सचा नवीन ट्रक प्लांट बांधत आहे, जो २०२६ मध्ये कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. नवीन शुल्कांचा या गुंतवणुकीवरही परिणाम होऊ शकतो.
शुल्क अंमलबजावणीची वेळ वाढवली Donald Trump on Tariff।
गेल्या महिन्यात, ट्रम्प यांनी सांगितले होते की, शुल्क १ ऑक्टोबरपासून लागू होऊ शकते, परंतु आता ही तारीख १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यांनी दावा केला की या निर्णयामुळे पीटरबिल्ट, केनवर्थ आणि फ्रेटलाइनर सारख्या अमेरिकन कंपन्यांना फायदा होईल.
अमेरिका सध्या जपान आणि युरोपियन युनियनसोबतच्या व्यापार करारांतर्गत हलक्या वाहनांवर १५% शुल्क लादते, परंतु मोठ्या वाहनांना हा नवीन नियम कसा लागू होईल हे स्पष्ट नाही.





