“भारताच्या टॅरिफचा रशियाला मोठा फटका” ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिनसोबतच्या बैठकीपूर्वी इशारा

Donald Trump on Russia। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात लवकरच बैठक होणार आहे. दोघेही अलास्कामध्ये चर्चा करणार आहेत. या बैठकीआधी ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी,”रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर लादलेला कर मॉस्कोच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असेल” असे मोठे विधान केले आहे. त्यांनी भारताला रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार म्हणून वर्णन केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पुतिन यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी, “जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रशियाच्या सर्वात मोठ्या किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या तेल खरेदीदाराला सांगतात की जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केले तर ५० टक्के कर लावला जाईल, तेव्हा तो निश्चितच त्यांच्याचसाठी मोठा धक्का आहे.” असे म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी असाही दावा केला की याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल.
ट्रम्प आणि पुतिन अलास्कामध्ये भेटणार Donald Trump on Russia।
अमेरिकेतील एका वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, पुढील आठवड्यात पुतिन आणि ट्रम्प यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीबद्दल ट्रम्प यांनी महिती देताना, “मला त्यांच्या (पुतिन) मनात काय चालले आहे ते पहायचे आहे. मला पहिल्या दोन मिनिटांत कळेल की कोणताही करार होऊ शकतो की नाही. कदाचित मग मी शुभेच्छा देईन आणि निघून जाईन.”असे विधान केले आहे.
ट्रम्पने भारतावर ५० टक्के कर का लादला ? Donald Trump on Russia।
अमेरिकेने सुरुवातीला भारतावर २५ टक्के कर लादला होता, परंतु त्यानंतर तो ५० टक्के केला. डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल त्यांना समस्या आहे. ट्रम्पने रशियावर युद्धाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता. भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार आहे, परंतु यावरही कोणताही करार झालेला नाही. ट्रम्पची इच्छा आहे की भारताने दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी क्षेत्रात करार करावा, परंतु भारत यासाठी तयार नाही.





