ट्रम्प यांचा पुतिन यांना दोन आठवड्यांचा अल्टिमेटम ; म्हणाले,”हल्ले थांबवा नाहीतर…”

Donald Trump on Putin । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉटलंडमध्ये ब्रिटीश पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत रशियाला अंतिम इशारा दिला. त्यांनी यावेळीरशियाने दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळात युक्रेनवरील हल्ले थांबवावेत अन्यथा त्यांना नवीन निर्बंध आणि शुल्कांना सामोरे जावे लागेल.” असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी मॉस्कोला इशारा दिला होता. यामध्ये त्यांनी,” जर रशियाने ५० दिवसांच्या आत शांतता करारावर सहमती दर्शवली नाही तर अमेरिका “खूप कठोर शुल्क” लादेल, एसेम म्हटले. परंतु काल त्यांनी सांगितले की ते अंतिम मुदत वाढवतील.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना “मी आजपासून सुमारे १० किंवा १२ दिवसांची एक नवीन अंतिम मुदत निश्चित करणार आहे,” ट्रम्प यांनी स्कॉटलंडमध्ये माधम्यांनी सांगितले. तसेच “वाट पाहण्यात काही अर्थ नाही.” असे म्हणत “आम्हाला कोणतीही प्रगती होताना दिसत नाही. असे त्यांनी म्हटले. दरम्यान, ट्रम्प यांनी लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सादिक खान यांना घृणास्पद व्यक्ती म्हटले आणि त्यांच्या कृतींचे वर्णन केले. तथापि, दरम्यान, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर आणि इतर लोक त्यांच्यासमोर उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प स्कॉटलंडमधील टर्नबेरी गोल्फ रिसॉर्टमध्ये उपस्थित Donald Trump on Putin ।
डोनाल्ड ट्रम्प २८ जुलै २०२५ रोजी त्यांच्या चार दिवसांच्या खाजगी दौऱ्यावर स्कॉटलंडमधील टर्नबेरी गोल्फ रिसॉर्टमध्ये होते. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक होती, परंतु एका पत्रकाराच्या प्रश्नाने संपूर्ण राजकीय चर्चेची दिशा बदलली. सप्टेंबरमध्ये लंडनला भेट देणार का असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, “हो, मी नक्कीच लंडनला जाईन, पण मी तुमच्या महापौरांचा चाहता नाही.” तो एक वाईट माणूस आहे. त्यांच्या या विधानाने वातावरण लगेचच तणावपूर्ण झाले. ट्रम्प यांच्यासोबत बसलेले ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर म्हणाले की ते माझे मित्र आहेत.
“लंडनची विविधता हीच आपली ताकद ”-सादिक खान Donald Trump on Putin ।
लंडनचे महापौर सादिक खान यांनी वैयक्तिकरित्या प्रतिसाद दिला नाही, परंतु त्यांचे प्रवक्ते आणि सहाय्यकांनी ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका केली. प्रवक्त्याने सांगितले की, ट्रम्प लंडनला येऊ इच्छितात याबद्दल सादिक आनंदी आहेत. त्यांना लंडनच्या विविधता आणि समावेशक संस्कृतीतून शिकायला मिळेल. याशिवाय, खान यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की ट्रम्प २०२० ची निवडणूक हरले आहेत, तर सादिक खान यांनी तीन वेळा महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.



