“आधी स्वतःच्या घरात बघा आणि नंतर इराण-इस्रायलची चिंता करा” ; पुतीनच्या ‘त्या’ ऑफरवर ट्रम्पचा पारा चढला

Donald Trump on Putin । सध्या मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमध्ये तणाव सुरू आहे. यासंदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मध्यस्थी करण्याबाबत चर्चा केली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी याविषयी बोलताना,”मी पुतिन यांच्याशी बोललो. ते म्हणत होते की त्यांना मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करायची आहे. मी त्यांना स्पष्टपणेसांगितले आहे कि, आधी तुमचे रशिया-युक्रेन भांडण संपवा, नंतर उर्वरित जगाची चिंता करा.” असे त्यांनी म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल माध्यमांशी बोलताना,”हा एक संवेदनशील विषय आहे, परंतु त्यावर उपाय शक्य आहे. आम्ही इराण, इस्रायल आणि अमेरिकेसोबत प्रस्ताव शेअर केले आहेत.’ असे त्यांनी म्हटले होते. पुतिन यांची भूमिका मध्यपूर्वेत राजनैतिक उपस्थिती वाढवण्याच्या रशियाच्या रणनीतीचे प्रतिबिंब आहे, परंतु ट्रम्प यांनी ते जाहीरपणे नाकारले. याशिवाय, ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबद्दल म्हटले की मृतांची संख्या लपवली जात आहे असा आरोप केला होता त्यासाठी त्यांनी उदाहरण देताना म्हणाले , इमारत कोसळते आणि तुम्ही म्हणता की कोणीही मरण पावले नाही, हा विनोद आहे का?”
इस्रायलचा पुतिन यांना प्रस्ताव Donald Trump on Putin ।
पुतिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की,”दक्षिण इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पात २०० हून अधिक रशियन कामगार काम करतात. हा रशियाच्या रोसाटॉमने बांधलेला तोच अणुऊर्जा प्रकल्प आहे. ” यावर पुतिन म्हणाले की,”इस्रायलने आम्हाला रशियन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी दिली आहे.”
इराण-इस्रायल संकट अन् अमेरिकेच्या लष्करी हालचाली Donald Trump on Putin ।
सध्या, इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, इस्रायलने अलीकडेच दावा केला आहे की त्यांनी ५० लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला. इराणने ड्रोन हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती देखील वाढवली आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.





