Donald Trump on Putin । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे एक योजना तयार आहे. असे सांगितले. त्यानुसार “ते त्यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांच्याकडे पाठवत आहेत” अशी माहिती देखील त्यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी यांच्याशी आपली भेट होऊ शकते असे संकेत देखील दिले आहेत. परंतु जर चर्चेत पुरेशी प्रगती झाली तरच हे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. त्यांनी सांगितले की ते उपराष्ट्रपती जे .डी. व्हान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, युद्ध सचिव पीट हेगसेथ आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुझी विल्स यांच्यासोबत प्रगतीचा आढावा घेतील. अबू धाबीमध्ये लष्कर सचिव ड्रिस्कॉल यांनी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांचे हे भाष्य आले. रशिया-युक्रेन चर्चा सकारात्मक दिशेने सुरू Donald Trump on Putin । लष्कर सचिवांचे राज्य प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जेफ टॉल्बर्ट यांनी, “चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहेत आणि आम्ही आशावादी आहोत.”असे म्हटले. चर्चा सुरू असताना, रशियाने रात्रीच्या वेळी कीववर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यामध्ये किमान सात लोक ठार झाले, तर दक्षिण रशियामध्ये युक्रेनियन हवाई हल्ल्यात तीन जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. माझ्याकडे कोणतीही अंतिम मुदत नाही Donald Trump on Putin । युक्रेन-रशिया शांतता योजनेसाठी “थँक्सगिव्हिंग डेडलाइन” बद्दल, एअर फोर्स वनमध्ये पत्रकार परिषदेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “काय होते ते पाहूया. त्यांनी एक तारीख निश्चित केली आहे. ती तारीख अगदी जवळच्या भविष्यात कधीतरी येईल. माझ्याकडे कोणतीही अंतिम मुदत नाही. माझ्यासाठी एकमेव अंतिम मुदत एकच आहे ती म्हणजे हे ज्यावेळी संपेल ती. आणि मला वाटते की प्रत्येकजण सध्या लढाई करून थकला आहे. ते बरेच लोक गमावत आहेत.”असेही त्यांनी यावली म्हटले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “हे अधिक कठीण आहे.” युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या संभाव्य भेटीबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “त्यांना यायला आवडेल, पण मला वाटते की आपण आधी एक करार करायला हवा. आमच्या चर्चा चांगल्या प्रकारे सुरू आहेत. आम्हाला वेळेत कळेल, पण आम्ही प्रगती करत आहोत. आम्ही आठ युद्धे सोडवली आहेत आणि मला वाटले की हे सोपे होईल कारण माझे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी असलेले संबंध आहेत, परंतु हे कदाचित अधिक कठीण युद्धांपैकी एक आहे कारण तिथे खूप द्वेष आहे. परंतु , लोकांना हे समजू लागले आहे की हा दोन्ही बाजूंसाठी एक चांगला करार आहे आणि त्यांना युद्ध थांबवावे लागेल. ते बरेच लोक गमावत आहेत, बहुतेक सैनिक.” गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या ट्रम्पच्या शांतता योजनेचे वर्णन रशिया समर्थक म्हणून करण्यात आले होते, त्यानंतर झेलेन्स्की यांनी लगेचच अमेरिकन वाटाघाटीकर्त्यांशी भेट घेतली. युरोपीय देशांनीही त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, शांतता प्रयत्न एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत आणि त्यांना गती मिळत आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनीही या चर्चेचे सकारात्मक वर्णन केले. मात्र, युक्रेनचे प्रतिनिधी ओलेक्झांडर बेव्हझ यांनी सांगितले की कोणताही करार झाला आहे असे म्हणणे खूप लवकर झाले आहे.