“जर युद्ध थांबले नाही तर मी युक्रेनला टॉमहॉक…” ; डोनाल्ड ट्रम्प यांची पुतिनला धमकी

Donald Trump on Putin। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या युद्धाविषयी म्हणजेच रशिया आणि युक्रेन युद्धाविषयी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी,”जर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील युद्ध संपवले नाही तर ते युक्रेनला लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्षेपणास्त्रे देऊ”अशी उघडउघड धमकीच दिली आहे. इस्रायलला जाताना एअर फोर्स वनमध्ये मध्यमकर्मींशी बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले.
राष्ट्रपतींनी सांगितले की, त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली होती, ज्यामध्ये त्यांनी टोमाहॉक क्षेपणास्त्रांसह शस्त्रास्त्रांची विनंती केली होती. ट्रम्प म्हणाले, “त्यांना टोमाहॉक हवे आहेत. हे एक मोठे पाऊल आहे. आता मी पुतिन यांना सांगू शकतो की जर युद्ध थांबले नाही तर आम्ही हे करू शकतो. “या विधानावरून ट्रम्प युक्रेनला चांगली शस्त्रे पुरवण्याच्या धमकीचा वापर करून पुतिन यांना युद्ध संपवण्यासाठी दबाव आणत आहेत” असेच दिसून येत आहे.
युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्रे मिळण्याचा अर्थ काय? Donald Trump on Putin।
युक्रेनने टोमाहॉक क्षेपणास्त्रे मिळवल्याने ते आता रशियाच्या आत खोलवर असलेल्या प्रमुख लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करू शकेल. या क्षेपणास्त्रांची रेंज २५०० किलोमीटरपर्यंत आहे, म्हणजेच युक्रेन मॉस्कोला लक्ष्य करू शकते.
यामुळे युक्रेनला रशियन कमांड सेंटर, लष्करी प्रशिक्षण तळ आणि पुरवठा साखळ्यांवर हल्ला करता येईल. रशियाला आपले हवाई संरक्षण आणखी वाढवावे लागेल, ज्यामुळे त्याची सुरक्षा कमकुवत होईल. टोमाहॉक क्षेपणास्त्रे अत्यंत अचूक आहेत आणि त्यांच्याकडे मोठे वॉरहेड आहेत. ते थेट रशियन तेल शुद्धीकरण कारखाने, लष्करी मुख्यालय आणि पुरवठा रेषांना लक्ष्य करू शकतात. युक्रेनची आक्रमक क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली जाईल. रशियाला आपली शस्त्रे वितरित करावी लागतील आणि मॉस्कोसह दूरच्या क्षेत्रांचे संरक्षण करावे लागेल. यामुळे शांतता चर्चेत युक्रेनची स्थिती मजबूत होईल. Donald Trump on Putin।





