Donald Trump on Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच इराणला अल्टिमेटम ; म्हणाले,”१० दिवसांत अणु करार केला नाही तर..”
Donald Trump on Iran: अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता इराणला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, ज्यामध्ये या दहा दिवसांत अणुकरार करण्याची मागणी केली आहे.

Donald Trump on Iran: अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता इराणला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, ज्यामध्ये या दहा दिवसांत अणुकरार करण्याची मागणी केली आहे.
तसेच त्यांनी इराण दहा दिवसांत अणुकरार करेल किंवा इराणला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. अशी थेट धमकी दिली आहे. त्यासोबतच “विचारमंथन करण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी दहा दिवस पुरेसा वेळ असेल. दहा दिवसांनंतर जे घडते ते खूप वाईट आणि दुर्दैवी असेल” असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका-इराण चर्चा जिनेव्हामध्ये सुरू
ट्रम्प यांचे हे विधान अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी मोठ्या युद्धाला रोखण्यासाठी अणुकरार करण्यासाठी वाटाघाटी करत असताना आले आहे.
काल, वॉशिंग्टनमध्ये गाझा पीस बोर्डाच्या पहिल्या बैठकीत ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, इराणने अणुकरारावर सहमती दर्शवली पाहिजे, अन्यथा संपूर्ण मध्य पूर्वेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
#WATCH | On Iran, US President Donald Trump says, “We’re either going to get a deal or it’s going to be unfortunate for them… 10-15 days would be enough time…”
(Source: US network pool via Reuters) pic.twitter.com/dUZSZqPlKZ
— ANI (@ANI) February 19, 2026
करारावर सहमती दर्शविण्याचा ट्रम्पचा सल्ला Donald Trump on Iran:
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकेला इराणसोबत एक मजबूत अणुकरार हवा आहे आणि इराणने शांततापूर्ण करारावर सहमती देणे मध्य पूर्वेच्या हिताचे आहे. संपूर्ण मध्य पूर्वेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करण्याचा इराणला कोणताही अधिकार नाही.
मात्र, जर इराणने पुढील १० दिवसांत करार केला नाही, तर अमेरिकेला एक पाऊल पुढे टाकावे लागेल. अरबी समुद्रात तैनात असलेल्या सैन्याला हल्ला करण्याचे आदेश द्यावे लागतील आणि त्याचे परिणाम भयानक होतील.
अणुकार्यक्रम बंद करण्याची अट नाकारली
अमेरिकेने इराणला त्याचा अणुकार्यक्रम बंद करण्यास सांगितले आहे. त्याने त्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या पल्ल्याची मर्यादा घालण्याची अट घातली आहे, परंतु इराण या दोन्ही अटी स्वीकारण्यास तयार नाही.
🚨 BREAKING: President Trump just issued a blunt warning to Iran.
“They must make a deal — or, if that doesn’t happen… bad things will happen.”
No vague language. No diplomatic fog.
“If they join us, great. If not, that’s great too. But it’ll be a very different path. They… pic.twitter.com/ZV4CapQS2S
— ⁿᵉʷˢ Barron Trump 🇺🇸 (@BarronTNews_) February 19, 2026
इराणने स्पष्टपणे सांगितले आहे की तो आपला अणुकार्यक्रम बंद करणार नाही कारण तो अणुशस्त्रे विकसित करण्यासाठी नाही, तर देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि विकासासाठी आहे. इराणवर अमेरिकेचा दबाव हा देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे.
अरबी समुद्रात तैनात अमेरिकेचा लष्करी ताफा Donald Trump on Iran:
इराणवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने अरबी समुद्रात आपला लष्करी ताफा तैनात केला आहे, जो राष्ट्रपतींचा आदेश मिळाल्यावर इराणमधील लक्ष्यांवर हल्ला करेल.
सुमारे ५० लढाऊ विमाने, विनाशक, क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालींसह दोन मोठ्या युद्धनौका तैनात आहेत. इराणने अमेरिकेला धमकीही दिली आहे की जर त्यांनी हल्ला केला तर ते मध्य पूर्वेतील १२ देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त करतील आणि दोन्ही युद्धनौका बुडवतील.





