Donald Trump on Iran। इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शने तिसऱ्या आठवड्यातही सुरु आहेत. अमेरिकेतील एका मानवाधिकार कार्यकर्त्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या निदर्शनांमध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इराणमध्ये १०,६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. या दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी बोलताना, “इराणने निदर्शकांच्या हत्येबाबत आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, ज्यांना मारले जाऊ नये असे लोक मारले जात आहेत. हे नेते हिंसाचाराद्वारे राज्य करतात आणि आम्ही याचा गांभीर्याने विचार करत आहोत.” असे म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचं सैन्य मजबूत पर्यायांवर विचार करत आहे आणि लवकरच निर्णय घेतले जातील’ असं म्हणत त्यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणविरुद्ध कारवाईसाठी कोणते पर्याय आहेत? Donald Trump on Iran। इराणविरुद्ध कारवाईसाठी अमेरिकन लष्करी नेतृत्व उद्या ट्रम्प यांना माहिती देणार आहेत. त्यासोबतच लष्करी हल्ले, सायबर शस्त्रांचा वापर, अतिरिक्त निर्बंध आणि सरकारविरोधी निदर्शने भडकवणे यासारख्या पर्यायांवर चर्चा केली जाईल. अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्यात ते अमेरिकन तळांना लक्ष्य करेल असा इशारा इराणने दिला आहे. संभाव्य कारवाईसाठी इस्रायल देखील हाय अलर्टवर आहे. ‘निदर्शकांना देवाचे शत्रू मानले जाऊ शकते’ Donald Trump on Iran। इराण निदर्शकांवर कारवाई करत आहे. वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी निदर्शकांवर कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी काही निदर्शकांवर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांसारखेच डावपेच अवलंबल्याचा आरोप केला आणि खून आणि जाळपोळीच्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, इराणचे अॅटर्नी जनरल मोहम्मद मोवाहेदी आझाद यांनी इशारा दिला आहे की अटक केलेल्या निदर्शकांवर देवाचे शत्रू असल्याचा आरोप केला जाऊ शकतो, हा गुन्हा मृत्युदंडाची शिक्षा देऊ शकतो.