‘आम्ही त्यांचं पितळ उघडं पाडलं म्हणून आता ते…’, डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दल मोठे विधान

Donald Trump on INDIA । अमेरिका आणि जगातील इतर देशांमधील व्यापार तूट कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबंधित देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादत आहेत. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारतावर परस्पर कर लादण्याची घोषणा केली आहे. आता, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताबाबत आणखी एक विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दलचे विधान Donald Trump on INDIA ।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे संकेत दिले की त्यांना आशा आहे की भारत लवकरच अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क कमी करेल.” पुढे डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहेत. कारण त्यांनी, “मला विश्वास आहे की भारत लवकरच अमेरिकेवरील कर कमी करणार आहे. पण २ एप्रिल रोजी आम्ही भारताकडून तोच कर आकारू.” असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘कोणताही देश अमेरिकन वस्तूंवर कोणताही कर लावेल, आम्ही २ एप्रिलपासून त्या देशाकडून तोच कर वसूल करू.” अशी मोठी घोषणा केली होती. मात्र ट्रम्प यांचे हे विधान त्यांच्या दाव्याच्या काही दिवसांनंतर आले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की भारताने शुल्क कमी करण्यास सहमती दर्शविली आहे.
ते पुढे म्हणाले, “भारत आमच्याकडून खूप जास्त दर आकारतो. खूप जास्त. तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाही. पण आता त्यांनी ते कमी करण्यास सहमती दर्शवली आहे कारण आता आम्ही त्यांचं पितळ उघडं पाडलं आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी भारताला ‘टॅरिफ किंग’ होते म्हटले Donald Trump on INDIA ।
त्याच वेळी, अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ‘टॅरिफ किंग’ म्हटले होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात वस्तू विकण्याच्या आव्हानांचाही उल्लेख केला. याशिवाय, ट्रम्प यांनी भारतासोबतच्या सुमारे १०० अब्ज डॉलर्सच्या व्यापार तूटकडेही लक्ष वेधले आणि दीर्घकाळापासून असलेले व्यापार असमतोल दुरुस्त करण्यासाठी भारताशी चर्चा करण्याची घोषणा केली.





