ट्रम्पची डेडलाईन संपली ! भारतावर लागू होणार ५० टक्के कर ; अमेरिकेने बजावली नोटीस

Donald Trump on India। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादण्याची नोटीस बजावली आहे. २७ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज रात्री १२.०१ वाजल्यापासून नवीन कर प्रणाली लागू केली जणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे आता ट्रम्प आणि भारत यांच्यातील अंतर आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प संतापले आणि त्यांनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे.
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की,”भारत रशियाकडून सतत तेल खरेदी करत आहे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहे” अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने सीमाशुल्क आणि सीमा संरक्षणाद्वारे कर बद्दल माहिती सामायिक केली आहे. ट्रम्प याद्वारे भारतावर दबाव वाढवू इच्छितात. त्यांनी यापूर्वी भारतावर २५ टक्के कर लादला होता, परंतु नंतर तो ५० टक्के केला.
ट्रम्पचा रशियाशी व्यापार करणाऱ्यांवर दबाव Donald Trump on India।
डोनाल्ड ट्रम्प रशियाशी संबंध असलेल्या देशांवर दबाव वाढवत आहेत. भारत आणि रशियामध्ये खूप चांगली मैत्री आहे आणि दोघांमध्ये व्यापारही होतो. ट्रम्प म्हणतात की भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे निधी देत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये बऱ्याच काळापासून युद्ध सुरू आहे. ते संपवण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशीही बैठक घेतली.
अमेरिकेच्या शुल्काला भारताची काय प्रतिक्रिया होती? Donald Trump on India।
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ५० टक्के शुल्क चुकीचे असल्याचे म्हटले होते. ते अन्याय्य असल्याचे म्हटले होते. भारताने सांगितले की ते ऊर्जेच्या गरजा आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन रशियाकडून तेल खरेदी करत आहे. तेल जिथे स्वस्त मिळेल तिथून खरेदी केले जाईल असेही म्हटले होते.
भारत -अमेरिकेत व्यापाराबाबत कोणताही करार झाला नाही
भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार होता, जो ट्रम्पच्या हट्टीपणामुळे अडकला आहे. ट्रम्प यांना भारताने त्यांच्यासाठी कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्र पूर्णपणे उघडावे अशी इच्छा आहे, परंतु भारत यासाठी तयार नाही. त्यांनी या मुद्द्यावर म्हटले आहे की शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही.





