ट्रम्प यांनी अचानक मेलोनींच्या सौंदर्याचे सुरु केले कौतुक ; म्हटले,”…तर तुमच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट”

Donald Trump on Giorgia Meloni। इजिप्तमधील गाझा शिखर परिषदेत जागतिक नेत्यांना संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधानांना “सुंदर महिला” म्हटले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेत, एखाद्या महिलेला सुंदर म्हणणे म्हणजे राजकीय कारकिर्दीचा शेवट आहे. ते म्हणाले की, हे माहित असूनही, ते एक चान्स घेतात आणि मेलोनीला सुंदर म्हणतात.
इजिप्तमधील शर्म अल-शेख येथील गाझा शिखर परिषदेत ७९ वर्षीय ट्रम्प ४८ वर्षीय मेलोनीवर भाष्य करत असताना, इतर नेत्यांसह मेलोनी त्यांच्या मागे हसत उभ्या होत्या. २५ हून अधिक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे नेते शिखर परिषदेत सहभागी झाले होते. शिखर परिषदेसाठी ट्रम्पच्या मागे स्टेजवर जमलेल्या ३० नेत्यांपैकी मेलोनी या एकमेव महिला नेत्या होत्या.
जर कोणी अमेरिकेत एखाद्या महिलेला सुंदर म्हटले तर… Donald Trump on Giorgia Meloni।
ट्रम्प यांनी भाषणाच्या मध्यभागी मेलोनी यांना संबोधित केले आणि म्हटले, “मला असे म्हणण्याची परवानगी नाही कारण सहसा, जर तुम्ही असे म्हटले तर ती तुमच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट आहे, परंतु मी म्हणेन की या एक सुंदर महिला आहेत.” तसेच पुढे बोलताना त्यांनी “जर तुम्ही अमेरिकेत एखाद्या महिलेबद्दल ‘सुंदर’ हा शब्द वापरत असाल, तर तुमची राजकीय कारकीर्द संपली असे समजा, पण मी एक इथे एक चान्स घेईन.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष मेलोनीकडे वळले आणि म्हणाले, “तुम्हाला सुंदर म्हटले जाण्यास काही हरकत नाही, नाही का? कारण तुम्ही आहात.” मेलोनीने त्यांच्या या वक्तव्यावर केवळ हसल्याचे पाहायला मिळाले. मेलोनीला सुंदर म्हटल्यानंतर ट्रम्पने त्यांचे कौतुक सुरूच ठेवले आणि म्हणाले, “इटलीमध्ये त्यांचा खूप आदर केला जातो. त्या एक अतिशय यशस्वी नेत्या आहेत.”
Trump to Giorgia Meloni:
“In the U.S., if you tell a woman she’s beautiful, your political career is over. But I’ll take my chances. You won’t be offended if I say you’re beautiful, right?“
— Spencer Hakimian (@SpencerHakimian) October 13, 2025
गाझा शिखर परिषदेच्या व्यासपीठावरून मेलोनीची प्रशंसा Donald Trump on Giorgia Meloni।
ट्रम्पने मेलोनीचे कौतुक करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रम्पने मेलोनीबद्दल केलेल्या कौतुकामुळे युझर्स चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. याविषयी युझर्सनी,”अशा संवेदनशील मुद्द्यावर झालेल्या बैठकीत महिला राष्ट्रप्रमुखांना अशी टिप्पणी करणे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना शोभत नाही.” असे म्हटले आहे.
सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याने लिहिले, “अशा वेळी, मला वाटत नाही की त्यांनी मेलोनीच्या लूकवर टिप्पणी करायला हवी होती. मेलोनी एक मजबूत आणि हुशार नेता आहे.”
दुसऱ्या एका महिला वापरकर्त्याने लिहिले, “मेलोनी या इटलीच्या आहेत… प्रशंसा स्वीकारल्यानंतरही त्या पुरुषांमध्ये त्यांचे स्थान टिकवून ठेवण्याइतकी मजबूत आहेत! त्या सुंदर आहेत! आणि तरीही त्यांनी स्टारमर आणि मॅक्रॉन यांना अस्वस्थ केले आहे, जसे ते आहेत. मेलोनीसारखे कोणीही चमकू शकत नाही.” दरम्यान,ट्रम्प यांचे या व्यासपीठावरील कौतुकावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका टिपण्या करण्यात येत आहेत.





