Donald Trump Hush Money Case । अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण हश मनी प्रकरणात शिक्षा पुढे ढकलण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती ती याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्याचे म्हटले जात आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला १.३ लाख डॉलर्स दिल्याच्या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ट्रम्प यांचे अपील फेटाळून लावले आहे आणि न्यायाधीश जुआन एम मर्चन यांना शुक्रवारी शिक्षा सुनावण्याची परवानगी दिली आहे. हश मनी प्रकरणात, डोनाल्ड ट्रम्पवर २००६ मध्ये स्टॉर्मी डॅनियल्ससोबतचे त्यांचे प्रेमसंबंध लपवण्यासाठी तिला हश मनी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. न्यूयॉर्कच्या न्यायालयांनी ट्रम्प यांना अध्यक्षांच्या अधिकृत कृतींशी नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक बाबींशी संबंधित व्यवसाय रेकॉर्ड खोटे ठरवल्याच्या ३४ गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. निकालावर न्यायाधीश मर्चन यांची प्रतिक्रिया Donald Trump Hush Money Case । हश मनी प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश जुआन एम मर्चन यांनी आधीच सांगितले होते की, ट्रम्प यांना शिक्षा होईल, परंतु ते ती देणार नाहीत. तसेच त्यांना दंडही आकारला जाणार नाही. तथापि, दरम्यान, ट्रम्प यांच्या वकिलांनी ही शिक्षा राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि चुकीची असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रपती होण्याची प्रक्रिया बाधित होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांचे वकील डी जॉन सॉयर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की ट्रम्प यांच्या अपीलवर सुनावणी होईपर्यंत शिक्षा पुढे ढकलली पाहिजे, जेणेकरून त्यांना अध्यक्ष होण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय Donald Trump Hush Money Case । सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि म्हटले की व्हर्च्युअल सुनावणीमुळे ट्रम्प यांच्या ट्रान्झिशन प्रक्रियेत व्यत्यय आणणार नाही. ट्रम्प यांच्यावरील खटल्यांचा अध्यक्षपदाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कृत्यांसाठी त्यांना दोषी ठरवणे योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. हेही वाचा बिहारमध्ये ईडीची मोठी कारवाई ; आरजेडी नेते आलोक कुमारांच्या घरावर छापा ; एकाच वेळी १९ ठिकाणी छापेमारी