Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी १० दिवसांचा युद्धविराम का घोषित केला? ; युद्धाचा पुढचा प्लॅन काय असणार ? वाचा
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या सुरु असलेल्या मध्य पूर्वेतील युद्धाला १० दिवसांचा युद्धविराम घोषित केला आहे.

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या सुरु असलेल्या मध्य पूर्वेतील युद्धाला १० दिवसांचा युद्धविराम घोषित केला आहे. मात्र हा युद्धविराम नेमका कशासाठी जाहीर करण्यात आला याविषयी आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसून येत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे इराणसोबत संवादासाठी प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे, पश्चिम आशियामध्ये अमेरिकेची लष्करी उपस्थिती वाढवण्याचा विचार करत आहेत. याच दरम्यान , त्यांनी ही युध्दविरामाची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत, संरक्षण विभाग मध्य-पूर्वेत १०,००० अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा विचार करत आहे. हे सैन्य ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजन व्यतिरिक्त असेल, ज्याला या प्रदेशात आधीच तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे म्हटले आहे. Donald Trump
१०,००० सैनिकांच्या तैनातीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु जर हे सैन्य तिथे पाठवले गेले, तर पश्चिम आशियामध्ये किमान १७,००० अमेरिकन सैनिक तैनात केले जातील. हे सैन्य तिथे आधीच तैनात असलेल्या ४०,००० ते ५०,००० अमेरिकन सैनिकांव्यतिरिक्त असेल. Donald Trump
अमेरिका लष्कराच्या ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनमधून किमान १,००० सैनिक तैनात करण्याची तयारी करत आहे. पेंटागॉन देखील दोन मरीन एक्सपेडिशनरी युनिट्स तैनात करण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यामुळे अंदाजे ५,००० मरीन आणि हजारो इतर नौदल कर्मचारी तैनात होतील.
ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प तेहरानसोबत चर्चेसाठी दबाव आणत आहेत आणि त्यांनी इराणच्या ऊर्जा क्षेत्रावरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले आहेत. ही स्थगिती ६ एप्रिलपर्यंत सुरू राहील.
यापूर्वी, २७ मार्च रोजी ट्रम्प यांनी हल्ल्याची अंतिम मुदत पाच दिवसांसाठी पुढे ढकलली होती. शांतता वाटाघाटींच्या मध्यस्थांच्या मते तेहरानने अतिरिक्त वेळेची मागणी केली नसली तरी, ट्रम्प यांचा दावा आहे की इराणच्या विनंतीवरून ही मुदत वाढवण्यात आली.
‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नेत्यांना चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, खूप उशीर होण्यापूर्वी वाटाघाटी सुरू झाल्या पाहिजेत, कारण एकदा त्या सुरू झाल्या की मागे फिरता येणार नाही. Donald Trump:
यापूर्वी, ट्रम्प यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की दोन्ही देश कराराच्या जवळ पोहोचले आहेत. गुरुवारी, अमेरिकेने प्रस्तावित केलेली १५-कलमी शस्त्रसंधी योजना इराणने नाकारल्यानंतर तेहरान “तडजोड करण्यासाठी आमची भीक मागत आहे” असे ते म्हणाले.






