‘डॉलरकडे दुर्लक्ष कराल तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत, चीनसह ब्रिक्स देशांना उघडपणे धमकी

Donald Trump and BRICS countries। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर जगाला वेठीस धरणारे मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर ते आता ब्रिक्स देशांवर नाराज आहेत. गेल्या काही काळापासून, ब्रिक्स देश त्यांचे स्वतःचे चलन सुरू करू करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरूनच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना थेट धमकी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांच्या चलनासंदर्भातील हालचालींवर बोलताना, आम्ही ब्रिक्स देशांना हे सांगू इच्छितो की अमेरिकन डॉलरची जागा कोणत्याही देशाचे चलन घेऊ शकत नाहीत. जर असे झाले तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लादला जाईल.” अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे.
…तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लादला जाईल Donald Trump and BRICS countries।
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी, “ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही फक्त प्रेक्षक आहोत पण हे आता चालणार नाही. आम्हाला असे वाटते की या शत्रू देशांनी नवीन ब्रिक्स चलन तयार करू नये किंवा अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी इतर कोणत्याही चलनाला पाठिंबा देऊ नये. जर हे केले नाही तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लादला जाईल.”असे म्हटले आहे. तसेच जर असे झाले नाही तर या देशांसाठी अमेरिकन बाजारपेठेचे दरवाजे बंद होतील, असे ट्रम्प म्हणाले. त्यांना दुसरी बाजारपेठ शोधावी लागेल. असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान,आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरऐवजी ब्रिक्स देश इतर कोणत्याही चलनाला प्राधान्य देतील अशी शक्यता नाही.

शपथ घेतल्यानंतर ट्रम्प प्रथम ओव्हल ऑफिसमध्ये पोहोचले आणि अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. यावेळी त्यांनी ब्रिक्स देशांना धमकी दिली आणि म्हटले की जर ब्रिक्सने अमेरिका विरोधी धोरणे आणली तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. ट्रम्प म्हणाले होते की या देशांनी अमेरिकेच्या हिताच्या विरोधात अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, जर हे देश भविष्यात असेच करत राहिले तर त्यांच्यासोबत जे घडेल त्यावर ते आनंदी राहणार नाहीत.
ब्रिक्समध्ये भारताचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रिक्स देशांना धमकी दिली होती की जर ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावर १०० टक्के कर लादतील. त्यांचा धोका ब्रिक्स आघाडीत समाविष्ट असलेल्या देशांसाठी आहे, ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे.
यासोबतच, तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया यांनी ब्रिक्सचे सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे. याशिवाय, इतर अनेक देशांनीही त्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, अमेरिकन डॉलर हे अजूनही जागतिक व्यापारात सर्वाधिक वापरले जाणारे चलन आहे आणि भूतकाळातील आव्हानांना न जुमानता त्याने आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. ब्रिक्स सदस्य आणि इतर विकसनशील देशांचे म्हणणे आहे की ते जागतिक वित्तीय व्यवस्थेतील अमेरिकेच्या वर्चस्वाला कंटाळले आहेत. अमेरिकन डॉलर आणि युरोवरील जागतिक अवलंबित्व कमी करून ब्रिक्स देशांना त्यांचे आर्थिक हितसंबंध अधिक चांगल्या प्रकारे साध्य करायचे आहेत.
रशियाने डॉलरविरुद्ध लॉबिंग केले Donald Trump and BRICS countries।
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर डॉलरचे शस्त्रीकरण केल्याचा आरोप केला आणि ती एक मोठी चूक असल्याचे म्हटले. त्यावेळी पुतिन म्हणाले होते की डॉलर वापरण्यास नकार देणारे आपण नाही. पण जर ते आम्हाला काम करू देत नसतील तर आम्ही काय करू शकतो? आपल्याला पर्याय शोधण्यास भाग पाडले जाते.





