Donald Trump : स्विस मालावर आता साडेबारा टक्के शुल्क; ‘ते’ आरोप फेटाळत व्यक्त केली नाराजी
ट्रम्प प्रशासनाने (Donald Trump) स्विस मालाच्या आयातीवर १२.५% नवीन शुल्क लागू केल्यानंतर, स्वित्झर्लंड सरकारने आपल्यावरील सक्तीच्या मजुरीचे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.

Donald Trump : ट्रम्प प्रशासनाने (Donald Trump) स्विस मालाच्या आयातीवर १२.५% नवीन शुल्क लागू केल्यानंतर, स्वित्झर्लंड सरकारने आपल्यावरील सक्तीच्या मजुरीचे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. अमेरिकेने ६० अर्थव्यवस्थांवर सक्तीच्या मजुरीचा मुकाबला करण्याच्या नावाखाली १०% ते १२.५% दरम्यान नवीन शुल्क लादले आहे.
‘यू.एस. ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’ (युएसटीआर) कार्यालयाच्या मते, सक्तीच्या मजुरीच्या उत्पादनांवर (Donald Trump) बंदी घालण्यात आणि अंमलबजावणीत अपयशी ठरल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मात्र, स्वित्झर्लंडने हे आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या उत्तरात स्विस सरकारने सांगितले की, त्यांनी युएसटीआर सोबतच्या चर्चेत आपली बाजू मांडली आहे.
‘इकॉनॉमीसुइस’ आणि ‘स्विसमेम’ यांसारख्या व्यावसायिक गटांनी हा निर्णय अयोग्य आणि समजण्यापलीकडचा असल्याचे म्हटले आहे. स्विस पुरवठा साखळीतून सक्तीच्या मजुरीने माल आणल्याचा कोणताही पुरावा नाही, तसेच हाय-टेक उत्पादने आणि आलिशान घड्याळे अशा वस्तू सक्तीच्या मजुरीतून बनू शकत नाहीत, असे स्विस उद्योगांनी स्पष्ट केले आहे.
या नव्या शुल्कांमुळे (Donald Trump) स्वित्झर्लंडला युरोपियन युनियन आणि ब्रिटनसारख्या कमी शुल्क असलेल्या देशांच्या तुलनेत स्पर्धेत मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्वित्झर्लंडची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून असून, या निर्णयामुळे अमेरिकेसोबतच्या व्यापारातील अनिश्चितता कायम आहे.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या संयुक्त करारानुसार स्विस मालावर १५% शुल्काची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे स्विस उद्योग क्षेत्राकडून आता अमेरिकेसोबत अधिक कायदेशीर आणि निश्चित व्यापारी करार करण्याची मागणी जोर धरत आहे.






