डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा झटका ! आता १०० टक्के टॅरिफ लावणार ; ‘या’ प्रॉडक्ट्सवर ५ दिवसांनीच होणार लागू

Donald Trump। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी औषध क्षेत्रावर १०० टक्के टॅरिफ लादला आहे. म्हणजेच आता औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. ट्रम्प यांनी औषध उत्पादनांवरील टॅरिफ वाढवत असल्याचे सांगितले.
त्यांनी पोस्टमध्ये ट्रम्प यांनी, “१ ऑक्टोबर २०२५ पासून आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनांवर १०० टक्के टॅरिफ लादू, जोपर्यंत कंपनी युनायटेड स्टेट्समध्ये उत्पादन कारखाना स्थापन करत नाही. जर एखाद्या कंपनीने आधीच प्लांट स्थापन केला असेल, तर त्यावर टॅरिफ लादला जाणार नाही. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.” असे म्हटले आहे.
स्वयंपाकघरातील काही वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ Donald Trump।
दुसऱ्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “१ ऑक्टोबर २०२५ पासून आम्ही स्वयंपाकघरातील कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी आणि संबंधित उत्पादनांवर ५० टक्के टॅरिफ लादू.” याव्यतिरिक्त, फर्निचरवर ३० टक्के टॅरिफ लादला जाईल. याचे मुख्य कारण म्हणजे इतर देश अमेरिकेत अशा उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहेत. हे अन्याय्य आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपण ते करायला हवे.
जड ट्रकवर २५ टक्के कर Donald Trump।
ट्रम्प म्हणाले, “आमच्या जड ट्रक उत्पादकांना परदेशातील अन्याय्य स्पर्धेपासून वाचवण्यासाठी, मी १ ऑक्टोबर २०२५ पासून जगातील इतर भागात उत्पादित होणाऱ्या सर्व जड ट्रकवर २५ टक्के कर लादत आहे. यामुळे पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलाइनर आणि इतर सारख्या आमच्या प्रमुख ट्रक उत्पादक कंपन्यांचे बाह्य हस्तक्षेपापासून संरक्षण होईल. आपण आमच्या ट्रक चालकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सक्षम ठेवले पाहिजे.”
भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून टॅरिफमुळे तणाव निर्माण झाला आहे, परंतु आता दोन्ही देशांमधील वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या अमेरिकेच्या भेटीनंतर व्यापार करारावर वाटाघाटी होण्याची आशाही वाढली आहे.





