“अमेरिका खूप शक्तिशाली, आमच्याशिवाय काहीही…” ; मोदींच्या चीन भेटीनंतरही ट्रम्पचा आडमुठेपणा कायम

Donald Trump। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफच्या मुद्द्यावर आपला दृष्टिकोन कायम ठेवला आहे. ट्रम्प यांनी काल याविषयी बोलताना, अमेरिका खूप शक्तिशाली आहे आणि त्याशिवाय जगात काहीही उरणार राहणार नाही” असे म्हणत आपला अतमुठेपणा पुन्हा एकदा जगाला दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन भेटीनंतर भारतावर लादलेल्या टॅरिफवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी याविषयी,”भारत जे काही वस्तू बनवत होता, ते ते अमेरिकेला पाठवत होते, परंतु १०० टक्के टॅरिफमुळे आम्ही काहीही भारताला पाठवू शकलो नाही.” असे म्हटले.
ओव्हल ऑफिसमधूनमाधम्यांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, “आम्ही भारतासोबत जास्त व्यापार करत नव्हतो, परंतु ते आमच्यासोबत व्यापार करत राहिले, कारण आम्ही त्यांच्याकडून कोणताही टॅरिफ आकारत नव्हतो, ते मूर्खपणाचे होते. त्यांनी जे काही वस्तू बनवल्या, ते त्यांनी अमेरिकन बाजारपेठेत पाठवले. अमेरिकेत ते खूप प्रभावी होते आणि आम्ही त्यांना काहीही पाठवत नव्हतो. ते आमच्याकडून १०० टक्के टॅरिफ आकारत होते.” असे त्यांनी म्हटले.
अमेरिकेशिवाय काहीही राहणार नाही Donald Trump।
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “अमेरिकेशिवाय जगात काहीही राहणार नाही. अमेरिका खूप मोठी आणि शक्तिशाली आहे. मी पहिल्या काही वर्षांत ते खूप मोठे केले आहे. मी जगातील अनेक युद्धे थांबवली आहेत आणि ही युद्धे व्यापाराच्या बळावर थांबवण्यात आली आहेत. व्यापारात टॅरिफने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर लादलेल्या टॅरिफचे समर्थन केले. ते म्हणाले की,”टॅरिफमुळे अमेरिकन नोकऱ्या वाचण्यास मदत होईल.”
टॅरिफबद्दल गोंधळ का? Donald Trump।
अमेरिकेने यापूर्वी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला होता, परंतु तो आणखी २५ टक्के वाढवला. अशाप्रकारे, भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादण्यात आला. ट्रम्प म्हणाले होते की भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, परंतु भारताने रशियासोबतच्या व्यापार संबंधांमध्ये कोणताही बदल केला नाही. या कारणास्तव ट्रम्पने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादले.





