“मस्कशी सगळे संबंध संपले, गंभीर परिणामांना…” ; डोनाल्ड ट्रम्पचा गंभीर इशारा

Donald Trump। डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ते त्यांच्या विधानांमुळे किंवा धोरणांमुळे सतत चर्चेत आहेत. ट्रम्प यांनीही अशी काही पावले उचलली ज्यामुळे त्यांना अनेक वेळा टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावेळी प्रकरण वेगळे आहे. आता ट्रम्प यांनी त्यांचे जवळचे मित्र, टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांना उघडपणे इशारा दिला आहे. हे तेच एलॉन मस्क आहे, जे ट्रम्प यांचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वात खास होते, पण बदलत्या काळानुसार दोघांमधील संबंध बिघडले आहेत.
दरम्यान, कर कपात आणि खर्च विधेयकावरून डोनाल्ड ट्रम्प त्यांचे माजी सहयोगी आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्याशी झालेल्या लढाईत मागे हटण्यास तयार नाहीत. ट्रम्प यांनी काल त्याला त्यांचे नाते सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही. येत्या मध्यावधी निवडणुकीत जर मस्कने डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत, मस्कसोबत करार करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. टेस्ला आणि स्पेसएक्सच्या अब्जाधीश सीईओसोबतचे त्यांचे संबंध संपले आहेत का असे विचारले असता? ट्रम्प यांनी उत्तर दिले,”मला वाटतं हो.” अमेरिकेचे अध्यक्ष पुढे म्हणाले की, “मी इतर कामात खूप व्यस्त आहे. तुम्हाला माहिती आहे, मी निवडणूक मोठ्या मतांनी जिंकली. माझ्या पहिल्या प्रशासनात त्यांना विश्रांती देण्याच्या आणि त्यांचे प्राण वाचवण्याच्या खूप आधी, मी त्यांना खूप ब्रेक दिले. मला त्याच्याशी बोलण्याचा कोणताही हेतू नाही.” असे म्हणत सगळे संबंध संपल्याचे म्हटले.
‘हो आमचे संबंध संपुष्टात आले’ Donald Trump।
या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्याशी त्यांचे संबंध संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं. ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘हो आमचे संबंध संपुष्टात आले असं मी आता गृहीत धरतो.’ तसेच इलॉन मस्क यांच्याबरोबरचे संबंध सुधारण्याची आता कोणतीही इच्छा नाही आणि मस्क यांनी आगामी मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असा मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना दिला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
मस्क यांच्याबाबत खूप निराश Donald Trump।
एलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, “एलॉन मस्क आणि माझे पूर्वी चांगले संबंध होते. पण आता मला माहित नाही की आम्ही एकत्र राहू शकू की नाही? इलेक्ट्रिक-वाहनांवरील कराबाबतच्या निर्णयानंतर टेस्ला प्रमुख निराश झाले असावेत. मी देखील मस्क यांच्याबाबत खूप निराश आहे. मी त्यांना खूप मदत केली”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.





