पुणे: शहरात अनेक नागरिक सकाळी सायंकाळी आपल्या कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला जात असतात. परंतु आता या नागरिकंना जरा सावधान व्हावे लागणार आहे. कारण कि जर कुत्र्याने रस्त्यावर घाण केली तर ती उचलून रास्ता धुवून द्यावा लागणार आहे. रस्त्यात घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना पालिकेच्या पालिकेच्या घन कचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. रस्ता धुण्याबरोबरच अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
फिरायला आणलेली कुत्री रस्त्यावर,पादचारी मार्गावर, मैदान तसेच बागेतही घाण करत असतात. या घाणीमुळे सकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. या सांर्भात अनेक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे कोथरूड क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेत घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांनाच ती घाण उचलायला लावली तसेच रस्ताही धुवून द्यायला लावला तर अनेकांना दंड देखील आकारला आहे.