अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा; IPL सुरु असतानाच धक्कादायक प्रकार !

मुंबई- मुंबई इंडियन्स चा खेळाडू अर्जुन तेंडुलकर याचा मैदानावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊच्या खेळाडू युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खान यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे.
युधवीरने अर्जुनला त्याच्या प्रकृतीबद्दल विचारले यावर अर्जुनने मला एक दिवसापूर्वी कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अर्जुनच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो आज लखनौ संघाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
Mumbai se aaya humara dost. 🤝💙 pic.twitter.com/6DlwSRKsNt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 15, 2023
दरम्यान, अर्जुनने आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले आहे. सनरायझर हैद्राबाद विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने आयपीएलची पहिली विकेट घेतली. तसेच त्याने आत्तापर्यंत 4 सामन्यात 9.5 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 3 बळी घेतले आहेत.





