Karad News : डॉक्टर दाम्पत्याची १ कोटी १५ लाखांची फसवणूक; कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Karad News : उंब्रज येथील नामांकित डॉक्टर दाम्पत्याला तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Karad News : मुलाला पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत डॉक्टर दांपत्याकडून ५० लाख आणि त्यानंतर नीट पीजी पेपरफुटी प्रकरणात अडकवण्याची तसेच सीबीआयकडून अटक होण्याची भीती दाखवून आणखी ६५ लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. (Karad News)
याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून कराडातील पुष्कर कुलकर्णी आणि उंब्रज येथील अनिकेत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Karad News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर दाम्पत्य उंब्रज येथे रुग्णालय चालवते. त्यांचा मुलगा एमबीबीएस झाल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत होता. याचदरम्यान पुष्कर कुलकर्णी याने मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. (Karad News)
१३ एप्रिल रोजी त्याने ३५ लाख रुपये स्वीकारले. त्याबदल्यात नोटरी केलेली उसनवार पावती आणि सुरक्षेसाठी धनादेश दिला. त्यानंतर आणखी १५ लाख रुपये घेऊन दुसरा धनादेश दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Karad News)
मात्र, प्रवेशाबाबत टाळाटाळ सुरू झाल्यानंतर दाम्पत्याला वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. नीट पीजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू असल्याचे सांगून दाम्पत्याला अटकेची भीती दाखवण्यात आली. संभाषणाचे रेकॉर्डिंग तपास यंत्रणेकडे असल्याचा दावा करत प्रकरण मिटवण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Karad News)
या दबावामुळे दाम्पत्याने बँकांतील ठेवी मोडून आणि सोन्याचे दागिने विकून ६५ लाख रुपये जमवले. २० ऑगस्ट रोजी ते मुलासह पुण्याला गेले असताना आंबेगाव परिसरात पिवळ्या नंबरप्लेटच्या चारचाकीतून आलेल्या एका व्यक्तीने स्वतःची ओळख सीबीआय अधिकारी म्हणून करून दिली. शिवीगाळ व दमदाटी करून पैशांची बॅग गाडीत ठेवण्यास सांगितले. भीतीपोटी दाम्पत्याने ६५ लाख रुपये त्याच्याकडे दिल्याचा आरोप आहे. (Karad News)
पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत पुष्कर कुलकर्णी याने प्रवेश मिळवून देऊ शकत नसल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. पुण्यात सीबीआय अधिकारी म्हणून आलेली व्यक्ती अनिकेत चव्हाण असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Karad News)
दोघांनी संगनमताने फसवणूक आणि खंडणीचा प्रकार केल्याचा आरोप आहे. एक कोटी १५ लाख रुपये परत करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच १५ ऑक्टोबर रोजी डॉक्टर महिला आणि त्यांच्या नातेवाइकांना कराडमधील हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. (Karad News)
तेथे तुरुंगात जावे लागेल, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच स्वतःला वकील सांगणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे. (Karad News)
पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तक्रारीतील आरोपांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. (Karad News)
Karad News : सावकाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल





