ओळखलं का कोण ते? अभिनेत्याचा लूक पाहून चाहते पडले विचारात

मुंबई – बॉलीवूडमधील अष्टपैलू ‘अभिनेता आयुष्मान खुराणा’ने आतापर्यंत ‘विकी डोनर’, ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ सारख्या सिनेमांचा समावेश आहे. ‘विकी डोनर’ आणि ‘अंधाधुन’ हे सिनेमे तर स्वतः आयुष्मान खुरानाही इतके प्रिय आहेत की या सिनेमांच्या स्क्रीप्ट तो एखाद्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवायला तयार आहे. सलग 6 सिनेमे सुपरहिट झाल्यामुळे आयुष्मान भलताच फॉर्मात आला आहे.
म्हणूनच आता आयुष्मान टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोचून महिलांच्या चेहऱयावर हास्य फुलवणार आहे. आयुष्मान नुकतंच एका प्रसिद्ध वॉशिंग पावडरचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर झाला आहे. त्याच्या अभिनयाचा जलवा दाखवणारी टीव्ही ऍड लवकरच दिसेल.
यामध्ये आयुष्मानने एका कुटुंबातील मजेशीर व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यामुळे या टीव्ही ऍड च्या माध्यमातून आयुष्मान घराघरात लोकांच्या चेहऱयावर हास्य आणि चमक आणण्याचे काम करेन.





