Mahendra Singh Dhoni । भारतीय क्रिकेट मधील अतिशय लोकप्रिय खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल अशीही त्याची ओळख आहे. धोनी जितका चांगला क्रिकेटर आहे तितकाच तो चांगला नेता आहे. खेळाचा मास्टरमाइंड महेंद्रसिंग धोनी आहे म्हणूनच की काय त्याला कॅपिटल कूल म्हणतात. मैदानावर कायम शांत राहून त्याने भारतीय क्रिकेटला एक वेगळे वळण दिलेले आहे. शांत राहण्याबरोबरच खेळातील अत्युच्च शहाणपण त्याच्याकडे आहे. त्यामुळेच यष्टीरक्षणाबरोबरच गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण याबाबतचा त्याचा अनुभव वादातीत आहे आणि त्यामुळेच अनेक खेळाडू त्याचा सल्ला घेत असतात. धोनी हा एकमेव खेळाडू आहे जो कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. धोनी आजपर्यंत मैदानात रागावताना दिसला नाही. तो आपल्या संघातील खेळाडूंना नेहमीच सपोर्ट करतो. धोनीचे असंख्य चाहते देशात आणि परदेशात आहेत. तो केवळ क्रिकेटपटूच नाही तर एक अतिशय यशस्वी असा कर्णधार आणि नेता देखील आहे. त्याच्या नेतृत्व कौशल्याविषयी… ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत करा Mahendra Singh Dhoni । धोनीचा प्रवास हा रेल्वे स्टेशनवर टीसीची नोकरी ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अशी झालेली आहे. या प्रवासात त्याने अतिशय कठोर मेहनत केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि तरुणाने तसेच ज्यांना विविध क्षेत्रात नेतृत्व करायचे आहे त्यांनी धोनीकडे असलेली कष्ट करण्याची तयारी त्याचा जिद्दी स्वभाव आणि सातत्याने प्रयत्न करत राहण्याची वृत्ती याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शांत आणि स्थिरचित्त राहण्याची क्षमता धोनीचा सांगण्यासारखा प्रमुख गुण म्हणजे मैदानावर कितीही आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरी तो शांत आणि स्थिरचित्त असतो. विद्यार्थ्यांनी आणि भविष्यात आपापल्या क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्यांनी या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. दबाव आणि तणावात्मक परिस्थितीत अचूक निर्णय कितीही दबावाची परिस्थिती असली तरी सुद्धा अचूक निर्णय घेण्याबाबत महेंद्रसिंग धोनी ची विशेष ओळख आहे. म्हणजेच परिस्थिती कितीही आव्हानात्मक आणि तणावपूर्ण असेल किंवा दबाव असेल तरीसुद्धा विचलित न होता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करण्याची अतिशय गरज असते. विनम्रता आणि जमिनीवर राहणे महेंद्रसिंग धोनीला देशभरात विलक्षण लोकप्रियता लाभलेली असली, त्याच्या चाहत्यांची संख्या सर्व दूर असली आणि मोठे यश मिळूनही आजही त्याचे वागणे विनम्र असते आणि तो नेहमीच जमिनीवर असतो. यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे गुण अतिशय महत्त्वाचे ठरतात. अपयशातून उसळी घेणे Mahendra Singh Dhoni । अन्य कुठल्याही खेळाडूंप्रमाणेच महेंद्रसिंग धोनीलाही त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये अनेकदा अपयशांचाही सामना करावा लागलेला आहे. मात्र अपयश आल्यानंतर त्याने तितक्याच जोरदारपणे उसळी घेऊन पुन्हा यशाला गवसणी घातलेली आहे. त्याचा हा गुण विद्यार्थ्यांनी आणि तरुण पिढीने निश्चितपणे लक्षात घ्यावा असा आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता धोनीच्या वागण्यात आणि स्वभावात पुरेशी लवचिकता आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता यामुळेच तो अन्य खेळाडूंच्या कितीतरी पुढे असतो. तरुणांनी या गोष्टीचा निश्चितपणे विचार करावा. प्रभावी संभाषण कौशल्य धोनीचे संभाषण कौशल्य देखील वादातीत आहे. त्यामुळे मैदानावर संघातील खेळाडूंना मार्गदर्शन हा करण्यात आणि उत्साह प्रेरणा देण्यात तो नेहमीच आघाडीवर असतो. भावी काळात आपापल्या क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या गोष्टीचा अभ्यास करावा.