“भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?,” आमदार लोणीकरांच्या विधानावरून रोहित पवारांची टीका

Rohit Pawar | भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. एका गावातील कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी सोशल मीडियावर सरकारवर अथवा आपल्यावर टीका करणाऱ्यांबाबत बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. “तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे,” अशी भाषा लोणीकर यांनी केली आहे. यावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, “भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते. एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?,” अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. Rohit Pawar |
“निवडणुकीआधी नरमी दाखवणारे, कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवणारे आता शेतकऱ्यांवरच खालच्या भाषेत बोलून गुरगरत असतील तर अशा लबाड लांडग्यांना शेतकऱ्यांचा आसुड दाखवावाच लागेल,” असेही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. Rohit Pawar |
भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते. एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?
निवडणुकीआधी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 26, 2025
बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले?
एका कार्यक्रमात बनराव लोणीकर म्हणाले, “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी 6 हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत.”
“तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?”, असे वादग्रस्त विधान लोणीकर यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी हे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. Rohit Pawar |
हेही वाचा:
अजय देवगणचा ब्लॉकबस्टर ‘रेड २’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कुठे?





