Dnyanganga School : ज्ञानगंगा स्कूलच्या तायक्वांडो-कराटेपटूंना घवघवीत यश; सहा खेळाडूंना पदक
Dnyanganga School :

Dnyanganga School : पुणे जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आयोजित खेड तालुकास्तरीय तायक्वांडो-कराटे क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये आळंदी येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेत शाळेच्या सहा खेळाडूंनी पदके मिळवत संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
हार्दिक लांडगे आणि रोहन दातखिळे यांनी सुवर्णपदक पटकावले. शिवराज काशीद, तृप्ती शिंगणे आणि लावण्या अरगडे यांनी रौप्यपदक मिळवले. अमेय जमदाडे याने कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्या हार्दिक लांडगे आणि रोहन दातखिळे यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल सर्व खेळाडू तसेच क्रीडाशिक्षक प्रफुल्ल शिंदे, धनश्री कायंदे आणि वैष्णवी कुबेर यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विजय गुळवे आणि सचिव वैष्णवी गुळवे यांनी विजेत्या खेळाडू व क्रीडाशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





