महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी बजावला मतदानाचा हक्क

मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास
कोरेगाव भिमा : शिरूर हवेली विधानसभा मतदान संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या १५ व्या निवडणुकीसाठी वाघोली येथे सकाळी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले लोकाभिमुख कार्य, महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवलेली लाडकी बहीण योजना, हजारो महिलांसह शिरूर हवेलीतील नागरिकांना घडवलेले महाकाल चे दर्शन, कोरोना काळात केलेली जनतेची सेवा यामुळे शिरूर हवेली तालुक्यातील जनतेचा विश्वास,
साथ व आशीर्वाद यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून आपण प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ असा सार्थ विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी व्यक्त केला.
दरम्यान मतदान केल्यानंतर कटके यांनी मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केले.





