DK Shivakumar-Eknath Shinde । महाराष्ट्र शिवसेनेत बंड करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता देशपातळीवर दखल घेण्यात येत असल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी केलेल्या बंडाची पुनरावृत्ती इतर राज्यात होण्याचे चिन्ह सध्या दिसून येत आहेत . त्यासाठीच भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कर्नाटक युनिटने एक धक्कादायक विधान केले. कर्नाटक विधान सभेचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी,” उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात साम्य असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसमध्ये असे अनेक लोक आहेत जे एकनाथ शिंदेसारखे असू शकतात, डीके शिवकुमार त्यापैकी एक असू शकतात.” असे म्हणत अशोक यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतात.” असे म्हटले आहे. डीके शिवकुमार यांच्या भाजपशी जवळीक असल्याच्या वृत्तांवर अशोक यांचे हे विधान समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत . उपमुख्यमंत्र्यांनी कोइम्बतूर येथील ईशा फाउंडेशनच्या महाशिवरात्री कार्यक्रमाला हजेरी लावली, जिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. ‘काँग्रेसमधील अंतर्गत कलह…’ DK Shivakumar-Eknath Shinde । कर्नाटक भाजप नेतृत्वाने याचा फायदा घेतला, ज्यामुळे सत्ताधारी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला. ही दरी आणखी वाढण्याची संधी लक्षात घेऊन, भाजप नेत्यांनी त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नेतृत्व बदलाची बऱ्याच काळापासून अपेक्षा होती. दरम्यान, कर्नाटक भाजपचे प्रमुख बीवाय विजयेंद्र म्हणाले, “काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला आहे. आता सर्वजण डीके शिवकुमार यांना लक्ष्य करत आहेत.” डीके शिवकुमार कर्नाटकात एकनाथ शिंदे होतील DK Shivakumar-Eknath Shinde । अशोक यांनी वर्तवलेल्या भाकितात अधिक स्पष्टता दाखवली. त्यांनी जाहीर केले की,कर्नाटकमध्ये लवकरच महाराष्ट्राप्रमाणेच गोंधळ पाहायला मिळेल, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन स्वत्रंत्र अस्तित्व निर्माण केले. त्याचप्रमाणे शिवकुमार हे देखील तसेच नेते होऊ शकतात जे भाजपसोबत युती करतील आणि काँग्रेस सरकार पाडतील.” असा दावा त्यांनी यावेळी केला. भाजप नेते अशोक पुढे म्हणाले, “ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे आणि शिवकुमार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे कारण ते प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी आणि शिवरात्रीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते जिथे ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत एकाच फ्रेम दिसले होते.”. दरम्यान, सध्या डीके शिवकुमार हे पक्षातील अंतर्गत कलहामुळे चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.