रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवळी धुमधडाक्यात ! मिळणार 78 दिवसांचा बोनस; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
Updated On:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 11.72 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्यास मंजुरी देण्यात आली.
बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बोनससाठी 2028.57 कोटी रुपये खर्च केले जातील. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन इत्यादींना बोनस दिला जाईल.
तथापि मंत्रिमंडळाने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या दोन मोठ्या योजनांना मंजुरी दिली. अन्न सुरक्षा आणि कृषी स्वावलंबन साध्य करण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजना व कृषोन्नती योजना यांचा एकूण प्रस्तावित खर्च 1,01,321.61 कोटी रुपये आहे.





