दयोदय गोशाळेमध्ये वसुबारस निमित्त दिवाळी पहाट व गोमाता पूजनाचे आयोजन

बारामती – शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे पाच वाजता दयोदय गोशाळेमध्ये वसुबारस निमित्त दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या कडे नोंदणीकृत दयोदय गोशाळेचा गोशाळेचा हा कार्यक्रम साजरा होत आहे.
यामध्ये गोमातेचे पूजन आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासाठी आकाशवाणी कलाकार सौ शिल्पा आठल्ये ह्या भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत या निमित्ताने गोमातेचे शास्त्रीय पूजन करून गोमातेचे आशीर्वाद घेतले जाणार आहेत.
गोमातेची सेवा करता यावी यासाठी परमपूज्य 1008 विद्यासागर जी महाराज आणि परमपूज्य शांतीसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने दयोदय गोशाळा बारामती मळद या ठिकाणी गोशाळा सुरू करून त्यामध्ये एक्सपिरीयन्स सेंटर सुरू करून वेगळाच अनुभव आपण घेतलेला आहे.
सध्या दयोदय गोशाळेत 310 गायींचा संभाळ केला जातो व या गोशाळेचे व्यवस्थापन कार्य देणगीदारांनी दिलेल्या देण्यातूनच केले जाते. येत्या डिसेंबर 2025 पासून डिजिटल डिटॉक्स डे म्हणून हा दिवस साजरा करण्याचे आयोजित आहे.
चंदूकाका सराफ ज्वेल्स या सुवर्णपेढींचा नावलौकिक असा आहे की जे कार्य करायचे ते कार्य उत्तम दर्जा, उत्तम सेवा या उदात्त हेतूने सर्व सामाजिक उपक्रम केले जातात. नजीकच्या काळामध्ये अशाच प्रकारच्या विविध उपक्रमांचा लाभ आपणाला अनुभवास अनुभवायला मिळणार आहेत.





