दिव्या खोसला ‘जिगरा’च्या फेक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर संतापली; आलियावर साधला निशाणा

Divya Khosla and Alia Bhatt | अभिनेत्री आलिया भटचा ‘जिगरा’ हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यास अपयशी ठरला. यावरून अभिनेत्री आणि दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारने आलियाच्या जिगरा चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करत टीका केली आहे. रिकाम्या थिएटरचा फोटो शेअर करताना दिव्याने आलियावर निशाणा साधला आहे.
आलिया भट्टने स्वत:चं चित्रपटाचे तिकीटे विकत घेत हाऊसफुलचे बोर्ड लावले, असा आरोपही दिव्याने केला आहे. दिव्याने जिगरा चित्रटाच्या कलेक्शनचे आकडे बनावट असल्याचं म्हटलं आहे. दिव्या खोसलाने थिएटरमधील एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हटलं आहे की, “मी सिटी मॉल पीवीमध्ये जिगरा चित्रपट पाहायला गेली होती. पण थिएटर पूर्ण रिकामे होते. सगळीकडे थिएटर्स रिकामे आहेत. आलिया भटमध्ये खरंच जिगरा आहे. स्वत:चं तिकीटे विकत घेऊन फेक कलेक्शनची घोषणा केली. मला प्रश्न पडलाय की, विकलेली मीडिया यावर काही बोलत का नाही?”
दिव्याच्या पोस्टवर करण जोहरची प्रतिक्रिया
दिव्या खोसलाच्या या पोस्टनंतर, करण जोहरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. जिगरा चित्रपटाचा निर्माता करण जोहरने “मूर्खाला उत्तर देण्यासाठी मौन हा सर्वोत्तम पर्याय आहे,” असे म्हंटले आहे. Divya Khosla and Alia Bhatt |
कंगणा रणावतची टीका
दरम्यान कंगणा रणावतने देखील कोणाचंही थेट नाव न घेता आलियाच्या जिगरा सिनेमावर निशाणा साधला. पोस्ट करत तिने लिहिले होते की, “जेव्हा तुम्ही स्त्रीप्रधान चित्रपटाची वाट लावता, तेव्हा ते चालत नाहीत. अगदी तुम्ही ते स्वत: बनवले तरीही. धन्यवाद.” या पोस्टमध्ये कंगनानं कोणाचंही नाव घेतले नाही, मात्र आलिया भट्टच्या भूमिकेवर हा अप्रत्यक्ष टोमणा मारल्याचे म्हंटले जात आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 4.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
हेही वाचा :
NIA चे आरोपपत्र ! लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर ; 700 शूटर्स, 6 देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य





