मालदिव प्रकरणादरम्यान दिव्या अग्रवाल ट्रोल; ‘या’ चुकीमुळे नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Divya Aggarwal : बिग बॉस ओटीटी 1 ची विजेती दिव्या अग्रवालने (Divya Aggarwal) नुकतेच पर्यटनाला चालना देण्याबाबत पोस्ट शेअर केली. सोबतच तिने मालदिवमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी लक्षद्वीपला भेट दिली होती. मात्र हे सुरु असताना मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’ हा ट्रेंड सुरू केला. देशात मालदीववर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात असताना दिव्यानेही याचे समर्थन केले आहे.
दिव्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. इतकेच काय तर तिने लग्नाबाबत देखील भाष्य केले आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘मालदीवमध्ये जे काही घडत आहे, त्याआधी मी माझ्याच देशात लग्न करण्यासाठी खूप उत्सुक होते. माझ्या बॅचलर पार्टीपासून ते हनिमूनपर्यंत मी सर्व काही भारतात करणार असल्याचा निर्णय घेतला होता. जगाकडे जे काही आहे ते सर्व आपल्याकडे आहे. समुद्रकिनारे, पर्वत, जंगले, वाळवंट. आपल्या सुंदर देशात पावसाळ्यापासून बर्फवृष्टीपर्यंत वर्षभर उत्तम हवामान असते.
View this post on Instagram
शेवटी तिने भारत सर्वांचे प्रेम आणि आदराने स्वागत करतो. आम्हाला अतिथी देवो भव शिकवले गेले आहे आणि त्याचे पालन आम्ही करत राहणार, असे म्हंटले. मात्र या पोस्टसोबत तिने मालदीवमधील फोटो शेअर केला आहे. यावरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एकीकडे दिव्याने मालदीवच्या विरोधात ही पोस्ट केली आहे पण तरीही ती ट्रोल झाली आहे.
‘आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी मालदीवचा फोटो पोस्ट करावा लागला’, ‘व्वा दीदी वाह… इतका वेळ बोलल्यानंतर मालदिवचाच फोटो पोस्ट केला.’ अशाप्रकारे अनेक यूजर्स दिव्याला ट्रोल करत आहेत. दरम्यान, दिव्या अग्रवालने 2022 मध्ये बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट केली होती. दोघे 7-8 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच दिव्या आणि अपूर्व लग्नबंधनात अडकणार आहेत.





