पुणे जिल्हा | रत्नाईमध्ये रंगली विभागस्तरीय कबड्डी स्पर्धा

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना व रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर आयोजित विभागस्तरीय 14 व 17 वर्षांखाली शालेय कबड्डी स्पर्धा 2024-25ला रंगत आली. येत्या सोमवारी (दि. 14) राज्यस्तरीय स्पर्धा रंगणार आहे.
राजगुरूनगर येतील रत्नाई महाविद्यालयाच्या पटांगणावर जिल्हातरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी खेडचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा अधिकारी दादा देवकाते, निवड समिती सदस्य दादा आढाव, प्रकाश मोरे, नितीन वरकड, रामदास रेटवडे, लतिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील 28 संघ सहभागी झाले होते. यामध्ये सोलापूरचे 8, अहमदनगरचे 8, पुण्याचे 8, पिंपरी चिंचवडचे 4 संघाचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये विजय संघ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पुणे विभागाचे नेतृत्व करतील पुढील प्रमाणे 17 वर्षांखालील मुले : अहमदनगर, 17 वर्षांखालील मुली- पुणे ग्रामीण, 14 वर्षांखालील मुले – सोलापूर ग्रामीण, 14 वर्षांखालील पुणे – पिंपरी चिंचवड.
या स्पर्धेचे आयोजन महाराजा कबड्डी संघ निमगाव दावडी या संघाने केले होते. स्पर्धा पार पाडण्यासाठी राहुल देशमुख, सतीश घाडगे, उमेश गाडगे, प्रकाश सांडभोर, सत्यवान तांबे, अनिल शिंदे, अनिकेत शिंदे, भरत मोरे, काळे सर, बंदी साबळे, सागर बोत्रे,
प्रणव शिंदे, ऋषी वाघमारे, आकाश कोंडे, नंदू राक्षे यांचे विशेष सहकार्य लाभले. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलींची स्पर्धा सोमवारी राजगुरूनगर येथील रत्नाई महाविद्यलयाच्या पटांगणावर होणार असल्याची माहिती राजकुमार राऊत दिली.



