Dive Ghat Closed : आज ‘या’ वेळेत दिवे घाट पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी पर्यायी मार्ग तपासा
Dive Ghat Closed : डोंगर कपारीत होणार नियंत्रित स्फोट; रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे एसटी आणि पीएमपी बस सेवेच्या मार्गातही बदल.
Updated On:

Dive Ghat Closed – आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी गुरुवारी (५ फेब्रुवारी) दिवे घाट सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.दिवे घाटात नियंत्रित स्फोटाद्वारे (ब्लास्टिंग टेक्नोलाॅजी) रुंदीकरण करण्यात येणार आहे.
घाटातील डोंगर रांगा, कपारीत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवे घाट गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. दिवे घाटातून सासवड, तसेच पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कोंढव्यातील बोपदेव घाटमार्गे इच्छितस्थळी जावे,
असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे. सासवड, पुण्याहून दिवे घाटमार्गे जाणारी एसटी बस, पीएमपी बस सेवा बोपदेव घाटमार्गे वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बोपदेव घाटाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





