Allu Shirish: हनुमान मंदिरातील डीजेच्या आवाजाचा त्रास; अभिनेत्याची थेट पोलिसांत तक्रार; ट्रोल करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर
Allu Shirish: 'डीजे लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे ही भक्ती नाही'

Allu Shirish: अभिनेता अल्लू अर्जुनचा भाऊ अभिनेता अल्लू शिरीषने हनुमान मंदिरात रात्री उशिरापर्यंत वाजणाऱ्या मोठ्या आवाजातील गाण्याचा त्रास झाल्यामुळे, त्याबाबत थेट पोलिसांत तक्रार केली आहे. हैदराबादमधील शेखपेट भागातील हनुमान मंदिरात रात्री २ ते ३ वाजेपर्यंत चालणाऱ्या आवाजाच्या त्रासामुळे त्याने पोलिसांकडे कारवाई मागणी केली होती.
परंतु धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. त्यानंतर ट्रोल करणाऱ्यांनाही शिरीषने उत्तर दिलं. “मित्रांनो, मी स्वतः धार्मिक आहे आणि हनुमानाची पूजा करतो. पण रात्री २ वाजता डीजे लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे ही भक्ती नाही. मी केलेली तक्रार ही सिव्हिक सेन्सबद्दल होती, भक्तीबद्दल नाही,” त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आल्याने त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
अल्लू शिरीषची तक्रार –
अल्लू शिरीषने पोस्टमध्ये म्हटले की, “हैदराबाद पोलीस, मी शेखपेट येथील अपर्णा वनमध्ये राहतो. गेल्या काही दिवसांपासून विनोबा नगर येथील हनुमान मंदिरात रात्री २-३ वाजेपर्यंत मर्यादेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात आहेत. मी याबद्दल फिल्म नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.”
Respected @hydcitypolice . I’m a resident of Aparna One, Shaikpet. For the last few days the Hanuman temple at Vinobha Nagar is playing loud music, beyond allowed decibels till night 2/3am. I complained the Film Nagar PS.
They asked us to bear till 25th Sept as its Ganesh… pic.twitter.com/ggJp4U4hdU
— Allu Sirish (@AlluSirish) September 27, 2026
“२५ सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन असल्यामुळे आम्हाला आवाज सहन करण्यास सांगण्यात आलं होतं. पण विसर्जन संपूनही गाणी वाजतच आहेत. आमच्या सोसायटीतील अनेक वृद्ध, लहान मुलं आणि नोकरदार लोक यामुळे त्रस्त आहेत. यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही. कृपया या प्रकरणात लक्ष द्यावे ही विनंती.. धन्यवाद,” असं अल्लू शिरीषने लिहिलं.
या पोस्टमध्ये अल्लू शिरीषने एक व्हिडीओही शेअर केला होता. व्हिडीओत मंदिरात मोठ्या प्रमाणात गाणी वाजत असल्याचं ऐकू येतं आहे. शिरीषच्या तक्रारीची हैदराबाद शहर पोलिसांनी दखल घेत, “सर, योग्य त्या कारवाईसाठी ही बाब आम्ही फिल्म नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना कळवली आहे,” अशी कमेंट त्यांनी केली होती.
Cumin Benefits: फोडणीपुरताच नाही, आरोग्यासाठीही खास! जीऱ्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?





