Pune District : गुंजाळवाडीच्या सरपंच स्मिता मुळे यांच्यावर अविश्वास

नारायणगाव : गुंजाळवाडी (आर्वी ता. जुन्नर) च्या सरपंच स्मिता सोपान मुळे यांच्यावरील अविश्वास बहुमताने मंजूर झाला आहे.
ग्रामपंचायत सदस्य विघ्नहर सोलाट व इतर सदस्यांनी तसे पत्र जुन्नर तहसीलदार यांना दिले होते. जुन्नर तहसीलदार सुनील शेळके यांनी 23 डिसेंबर रोजी दिलेल्या पत्रानुसार 30 डिसेंबर 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालय गुंजाळवाडी (आर्वी) येथे आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या सभेत सरपंच स्मिता मुळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
सरपंच मुंबईत राहत असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होणे, सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मीटिंगचे आयोजन करणे, स्थानिकांना विविध दाखले, कागदपत्रे आणि उतार्यांना हेलपाटे मारावे लागत असणे, गावातील विकास कामांमध्ये अथवा नियोजनांमध्ये सरपंचांचा सहभाग नसणे, मनमानी कारभार करणे या कारणांमुळे अविश्वास दर्शक ठराव मंजूर करण्यात आला.





