\nआज मतदान, मंगळवारी निकाल 

\n

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या बेस्ट पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे, तर मंगळवारी 19 आॅगस्ट त्याचा निकाल लागणार आहे. निवडणुकीला काही तास उरले असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका व्हिडीओमध्ये समृद्धी पॅनलच्या पॅम्प्लेटसोबत एक हजार रुपये देण्यात आले आहे. याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे म्हंटले आहे.

\n

काय म्हणाले संदीप देशपांडे ? 

\n

“आज बेस्ट पतपेढीची निवडणूक होणार आहे. अनेक पॅनल ही निवडणूक लढवत आहेत. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीने या निवडणुकीत राजकारण व्हायला सुरू झाले आहे. मतदारांना पैशाचे आम्हीच दाखवले जात आहे. त्यांच्याकडे घरोघरी पैसे पाठवले जात आहेत. काल आमचे सदस्य दत्तात्रय पेडणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचे पॅम्प्लेट आले. त्या पॅम्प्लेटच्या आतमध्ये एक लिफाफा होता. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या दोन नोटा सापडल्या.”

\n

“इतक्या घाणेरड्या पद्धतीने या निवडणुका लढवल्या जाणाऱ्या असतील तर याच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. यासंदर्भातील तक्रार आम्ही आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे करणार आहोत. बेस्टचे सगळे सदस्य सुज्ञ आहेत. अशा भुलथापांना, पैशांच्या आमिषांना ते बळी पडणार नाहीत. अशा पद्धतीने जे कोणी वागत असेल त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. Mumbai BEST Election ।

\n

महायुती विरुद्ध ठाकरे बंधू निवडणूक  ? 

\n

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिडेच्या निवडणुकीत ठाकरे बंधु एकत्र आल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात ठाकरे गट आणि शिवसेना मनसेने एकत्र येऊन उत्कर्ष पॅनेल या निवडणूकीत उतरवले आहेत.

\n

तर ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे गटाचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृध्दी पॅनल निवडणुकीसाठी उभं केलं आहे. याशिवाय बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा 21 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. Mumbai BEST Election ।

\n

हेही वाचा :

\n

युक्रेनला ‘नाटो’चा पाठिंबा ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी युरोपीय नेत्यांनी ‘हे’ सांगितले

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप; मनसेचा महायुतीच्या पॅनलवर गंभीर आरोप","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/News-photo-thumbnail-11-5.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/distribution-of-money-to-voters-in-best-patpedhi-elections-mns-makes-serious-allegations-against-mahayuti-panel#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/News-photo-thumbnail-11-5.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/distribution-of-money-to-voters-in-best-patpedhi-elections-mns-makes-serious-allegations-against-mahayuti-panel#webpage","name":"बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप; मनसेचा महायुतीच्या पॅनलवर गंभीर आरोप","url":"https://www.dainikprabhat.com/distribution-of-money-to-voters-in-best-patpedhi-elections-mns-makes-serious-allegations-against-mahayuti-panel","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/distribution-of-money-to-voters-in-best-patpedhi-elections-mns-makes-serious-allegations-against-mahayuti-panel#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/News-photo-thumbnail-11-5.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/distribution-of-money-to-voters-in-best-patpedhi-elections-mns-makes-serious-allegations-against-mahayuti-panel#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/distribution-of-money-to-voters-in-best-patpedhi-elections-mns-makes-serious-allegations-against-mahayuti-panel","name":"बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप; मनसेचा महायुतीच्या पॅनलवर गंभीर आरोप"}}]}}}

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप; मनसेचा महायुतीच्या पॅनलवर गंभीर आरोप