पुणे जिल्हा | बीजेएस विद्यालयात मुलींना 27 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

वाघोली, (प्रतिनिधी) – भारतीय जैन संघटनेच्या वाघोली विद्यालयामध्ये मालाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे सुमारे 27 लाख रुपये शिष्यवृत्तीचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी फोनिक्स मॉल विमान नगर येथील शोरूमचे स्टोअर हेड जेरीस सर, स्टोअर मॅनेजर बोस मॅडम, विजय बिरारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बीजेएसच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, प्राचार्य संतोष भंडारी कर्नल उपेंद्र विसाळ, वर्षा विसाळ, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, पर्यवेक्षक पांडुरंग पवार,
उपप्राचार्य पोपटराव गेठे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य संजय गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी मालाबार गोल्ड तर्फे मागील दोन वर्षापासून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनीना मिळत असल्याचे सांगितले, तसेच मालाबारचे आभारही मानले. मागील तीन वर्षांपासून बीजेएसच्या सुमारे चारशे विद्यार्थिनींनी सुमारे चाळीस लाख रुपये शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे.
यावेळी प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड यांनी विद्यार्थिनींना येणार्या संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जा आणि आपली ध्येये पूर्ण करा. ध्येय पूर्ण करण्यासाठी भारतीय जैन संघटना नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा आत्मविश्वास मुलींना दिला.
बीजेएसचा माजी विद्यार्थी विनोद गव्हाणे यास नुकतेच अमेरिका येथे नोकरीसाठी संधी मिळाल्याबद्दल अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. राणी तोरडमल यांनी तर प्रा. प्रियांका डोंगरे यांनी आभार मानले.




