रेशनकार्ड धारकांसाठीचा आनंदाचा शिधा वाटप करा

अकोले – महाराष्ट्र शासनातर्फे नागरिकांना गौरी गणपतीत शासनाचा रेशनकार्ड धारकांसाठी आलेला आनंदाचा शिधा अकोले तालुक्यात त्वरीत वाटप करावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचेवतीने अकोलेचे तहसीलदार यांना आनंदाचे शिधा वाटपबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, रमेश राक्षे, महेश नवले, राम रुद्रे, दत्ता ताजणे, नरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
शासनाच्यावतीने गाैरी गणपती उत्सवानिमित्त नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यात आला. मात्र, अकोले तालुक्यात धान्य वाहतूक करणाऱ्या ठेकेदारानेच अकोलेत उशिरा १६ सप्टेंबरच्या जवळपास अकोले गोडावूनला माल पोहोचवल्याची माहिती असून, त्यानंतरही वाहतूक ठेकेदाराने अद्यापही तालुक्यातील गावागावांतील रेशन दुकानदारांना आनंदाचा शिधा सर्वाना पोहच केला नाही, अजूनही वाहतूक सुरूच आहे. तालुक्यात गरीब, मोलमजुरी करणारे भूमिहीन लोक मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्र शासनाकडून आनंदाच्या शिधामध्ये अल्पदरात तेल, रवा, डाळ, साखर इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहे. मात्र, या सर्व घटकांना गणपती विसर्जन होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप बऱ्याच गावांना शासनाकडून आनंदाचा शिधा वाटप झालेले नाही.
वाहतुकीच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाकडून आलेला आनंदाचा शिधा ताबडतोब ग्राहकांना, नागरिकांना वाटप करावा, अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायतीने केली आहे. निवेदनावर मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, रमेश राक्षे, महेश नवले, माधवराव तिटमे, ज्ञानेश पुंडे, राम रुद्रे, दत्ता ताजणे, भाऊसाहेब वाकचौरे, किरण चौधरी, नरेंद्र देशमुख , सुनिल देशमुख, गंगाराम धिंदळे, प्रकाश कोरडे, शारदा शिंगाडे, मंगल मालुंजकर, शोभा दातखिळे, सुदाम मंडलिक, प्रमोद मंडलिक, रामहारी तिकांडे, कैलास तळेकर, रामदास पांडे, राजेंद्र घायवट, राजेंद्र लहामगे, जालिंदर बोडके, धनंजय संत, मोहन मुंढे, गणपत थिगळे आदींची नावे आहेत.





