भारतासाठी ‘हे ‘ठरू शकते सर्वात मोठे आव्हान, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी मांडली भूमिका

नवी दिल्ली – तंत्रज्ञानाने केवळ सक्षम बनवले जाऊ शकते. मात्र लोकांच्या जागेवर तंत्रज्ञानाला बदलले जाऊ शकत नाही, असे प्रतिपदन संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले आहे. रायसिना डायलॉगच्या अखेरच्या दिवशी संरक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांच्या मुकाबल्याच्या मुद्यावर बोलताना त्यांनी मनुष्यबळाच्या प्रत्यक्ष सहभागाला कमी लेखून चालणार नाही, असे मत मांडले.
सीडीएस अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात हायब्रिड युद्धनितीशी सामोरे जाण्यासाठी सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना पारंपारिक युद्धतंत्राबरोबर काळाला सुसंगत अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याच्या मुद्यावर विशेष भर दिला.
भारतासारख्या बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक आणि बहुजातीय देशासाठी, चुकीची माहिती आणि अंतर्गत कलह हे एक मोठे आव्हान असू शकते, असे त्यांनी निरीक्षण नोंदवले. चुकीची माहिती ही मनाची लढाई किंवा संज्ञानात्मक युद्ध आहे आणि ते एक मोठे आव्हान असू शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
संरक्षण प्रमुखांनी सायबर स्पेस, चुकीची माहिती आणि आर्थिक जबरदस्ती हे समकालीन युद्धाचे आवश्यक घटक असल्याचे सांगितले. जागतिक सुरक्षा वातावरण अनिश्चितता आणि जलद बदल या दोन आव्हानांनी भरलेले आहे. पारंपारिक युद्धांबरोबरच हायब्रिड युद्धांसाठी लोकांना प्रशिक्षित करणे, हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रचंड वेग आणि लोकांना तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देणे हे एक आव्हान आहे असे म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतासमोरील सुरक्षाविषयक आव्हानांबद्दल बोलताना देशाला विविध आव्हानांना एकाचवेळी सामोरे जावे लागते आहे. भारताला असमतोल धोक्याना सामोरे जावे लागते आहे, असे जनरल चौहान म्हणाले. मात्र त्यांनी कोणत्याही धोक्याचा स्पष्ट उल्लेख केला नाही.
तंत्रज्ञान फक्त सक्षम करणारे असू शकते पण ते लोकांना बदलू शकत नाही. हे खूप महत्वाचे आहे. प्रत्यक्ष सहभागाचे युद्धतंज्ञ महत्वाचे असले तरी तंत्रज्ञानाने युद्धाला सामोरे जाणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याचे योग्य प्रशिक्षण देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जगापुर्वी भारताने धोके ओळखले…
दहशतवादाविरोधातले ग्लोबल वॉर अगेन्सट टेरेरिझम किंवा फोर्थ जनरेशन वॉरफेअर किंवा हायपर कॉन्फ्लिक्ट अशा संज्ञांचा वापर जगाकडून होण्यापुर्वीच भारताने या संज्ञांचा वापर करायला सुरुवात केली होती. याचा अर्थ भारताने हे धोके पुर्वीच ओळखले होते आणि या धोक्यांचा सामना करायला सुरुवात देखील केली होती, असे ते म्हणाले.




