Disha Salian Case News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचे समोर आले आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे दिशा इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. तसेच पोलिसांनी दोन सेलिब्रेटींचा जबाब नोंदवला होता. यामुळे आता अनेक नवीन खुलासे झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये अभिनेता मिलिंद सोमण आणि अभिनेत्री दिशा पटणी यांच्या नावाचा उल्लेख आहे. दिशा सालियान काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी थेट सबंधित असलेल्या मिलिंद सोमण आणि दिशा पटणीचा यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता. दिशा पटणी आणि मिलिंद सोमण यांनी कॉर्नरस्टोन या कंपनीशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींशी संवाद ठेवण्याची आणि बोलणी करण्याची जबाबदारी दिशा सालियनवर होती. करारात नमूद नसलेल्या गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटानीने नकार दिल्याने दिशा सालियन टेन्शनमध्ये होती. मिलिंद सोमणने एका मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केल होत. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. मिलिंद सोमणने #banchinaproducts हे ट्विट केल होते. यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला होता. करार संपुष्ठात आल्याने मी केलेले ट्वीट डिलीट करणार नाही अशी भूमिका सोमण यांनी घेतली होती. आणि यामुळेच दिशा तणावात असल्याचं सांगण्यात येत होत. पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्या केल्याचे नमूद करत ती कोणत्या कारणास्तव तणावात होती हे स्पष्ट केले होते. वडिलांच्या अफेअरबद्दलची माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. त्यामुळे आता या दोन कलारांकडे देखील बोट दाखवले जात आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच मृत्यू दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होते, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, रोज नवीन खुलासे होत आहेत.