दिशा पटानीला लागली लॅाटरी…. आता थेट हॅालीवूडमध्ये एन्ट्री! ‘या’ जबरदस्त अॅक्शन चित्रपटात दिसणार

Disha Patani: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते, ती आता हॉलिवूडमध्ये तिच्या हॉट मूव्हज दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत आता दिशा पटानीही हॉलिवूडकडे वळली आहे. ती ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
‘होलीगार्ड्स’ या सुपरनॅचरल अॅक्शन-थ्रिलर चित्रपटातून दिशा हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅास्कर विजेते चित्रपट दिग्दर्शक केविन स्पेसी करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे केविन तब्बल २० वर्षांनी चित्रपटसृष्टीत परतणार आहेत. या चित्रपटात डॉल्फ लुंडग्रेन, टायरेस गिब्सन आणि ब्रायना हिल्डेब्रँड सारखे अनेक हॅालीवूड स्टार्स दिसणार आहेत.
View this post on Instagram
‘होलीगार्ड्स’ हा ‘स्टॅटिगार्ड्स विरुद्ध होलीगार्ड्स’ नावाच्या फ्रँचायझीचा भाग असून या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. सध्या हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट त्याच्या पोस्ट-प्रॉडक्शनपासूनच खूप चर्चेत आहे. त्यामुळे प्रेक्षक होलीगार्ड्स’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील दिशाचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. दिशाचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असणार आहे. ती या चित्रपटात कोणती भूमिकेत असणार आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दिशा यापूर्वी जॅकी चॅनसोबत ‘कुंग फू योगा’मध्ये दिसली होती.
‘विलकम टू द जंगल’मध्ये मोठी स्टारकास्ट
दिशाच्या बॉलिवूडमधील कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि संजय दत्तसह एक मोठी स्टारकास्ट असणार आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे.





