Disha Patani : विचित्र ड्रेसमुळे अभिनेत्री ‘दिशा पटानी’ ट्रोल; आयपीएलच्या उद्घाटन समारंभात नेमकं काय घडलं, पाहा….

Disha Patani – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
नुकतंच आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिशा पटानीने तिच्या परफॉर्मसने लोकांची मने जिंकली असताना, तिला ड्रेसवरून मात्र चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील तिच्या कपड्यांवरून लोकं तिला जास्तच ट्रोल करत आहेत.
शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरुवात अतिशय भव्य सोहळ्याप्रमाणे झाली. समारंभात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. शाहरुखने तर विराटला त्याच्या गाण्यावर डान्सही करायसा लावाला होता.
पण या कार्यक्रमात सर्वात जास्त ट्रोल करण्यात आलं ते दिशा पटानीला. झळ असं की, सुरुवातीला दिशा पटानीनेही तिच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पण सोशल मीडियावर तिने घातलेल्या कपड्यांची चांगलीच चर्चा रंगली.
Disha Patani Performance At IPL Opening Ceremony#IPL #KKRvRCB pic.twitter.com/GfK4DJ4TUL
— 𝗩ɪʀᴀᴛɪᴀɴ™ (@Viratian18GOAT) March 22, 2025
यावेळी तिने आयव्हरी ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्ट घातला होता. तिने या पोशाखामध्ये उत्तम डान्स केला. पण अनेक युजर्सने तिच्या ड्रेसवरून तिला चांगलंच सुनावलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या कपड्यांना अश्लिल अशी कमेंट सुद्धा दिली आहे. दिशा नेहमीच आपल्या बोल्ड लुक मुळे चर्चेत असते.
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या कपड्यांवर टिका करत तिला प्रश्न विचारला की, ‘खरंच हा ड्रेस आयपीएलच्या सोहळ्यासाठी होता का?’ नेटकऱ्यांच्या मते आयपीएलच्या उद्घाटन सोहळा हा कौटुंबिक प्रेक्षकांसाठी असल्याने असा पोशाख यासाठी अयोग्य आहे. हे क्रीडा स्पर्धेसाठी योग्य नव्हते. आयपीएल समारंभात अशा कपड्यांना परवानगी देणे योग्य नव्हते” अशा पद्धतीने दिशाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
दिशाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही तिला बऱ्याचदा तिच्या कपड्यांच्या स्टाइलवरून ट्रोल करण्यात आलं आहे. तिचे सोशल मीडियावर देखील अनेक बोल्ड आणि हॉट कपड्यांमधील फोटो-व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.





