Riteish Deshmukh: ‘देशाची ड्युटी’वरून रंगली चर्चा! रितेश देशमुखचा रवी किशन यांना टोला की निव्वळ योगायोग?
Riteish Deshmukh रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाचंही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. 'बिग बॉस मराठी'नंतर त्याने या शोमध्येही आपल्या सहज आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र त्याच्या एका संवादामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शिका फराह खान सूत्रसंचालन करत असलेला ‘लॉक अप सीझन २’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. स्पर्धकांचे वाद, नवे ट्विस्ट आणि धक्कादायक खुलासे यामुळे हा शो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र यावेळी चर्चेचा विषय कोणताही स्पर्धक नसून स्वतः रितेश देशमुख ठरला आहे. शोमधील त्याच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याने अभिनेता आणि खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा रंगली आहे.
नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात शोमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखीजा ही स्पर्धक नसून ‘इन्फॉर्मर’ म्हणजेच घरातील घडामोडींची गुप्त माहिती देणारी व्यक्ती असल्याचा खुलासा करण्यात आला. हा खुलासा ऐकून घरातील स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही धक्का बसला.
या वेळी रितेश देशमुखने अपूर्वाचं कौतुक करत म्हटलं, “सर्वप्रथम अपूर्वा, तू खूप छान काम केलंस. तुला दिलेली जबाबदारी तू उत्तम प्रकारे पार पाडलीस. तुला देशाची ड्युटी करायची नाहीये, पण देशमुखने दिलेली ड्युटी आता संपली आहे.” (Riteish Deshmukh)

Riteish Deshmukh: ‘देशाची ड्युटी’वरून रंगली चर्चा! रितेश देशमुखचा रवी किशन यांना टोला की निव्वळ योगायोग?
रितेशचं हे वाक्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. विशेष म्हणजे, “देशाची ड्युटी” या शब्दांमुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याचा संबंध थेट अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांच्या काही दिवसांपूर्वीच्या वक्तव्याशी जोडला. त्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. (Riteish Deshmukh)
काही दिवसांपूर्वी रवी किशन आणि त्यांची मुलगी रीवा किशन हे एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र काही कारणांमुळे रवी किशन यांनी हा शो अर्धवट सोडला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, “मला सिस्टमकडून संदेश आला आहे. देशाच्या सेवेसाठी मला तातडीने बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे मला हा शो सोडावा लागत आहे.” त्यांच्या या विधानाची त्या वेळीही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. ( Riteish Deshmukh)
आता ‘लॉक अप २’मध्ये रितेशने “देशाची ड्युटी” असा उल्लेख केल्यानंतर अनेकांनी हा संवाद रवी किशन यांच्या विधानाशी जोडला आहे. काही नेटकऱ्यांच्या मते हा अप्रत्यक्ष टोला होता, तर काहींच्या मते हा केवळ योगायोग असू शकतो. मात्र रितेश देशमुख किंवा रवी किशन या दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या चर्चेला कोणताही ठोस आधार मिळालेला नाही. (Riteish Deshmukh)
दरम्यान, ‘लॉक अप सीझन २’ आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. प्रत्येक भागात नवे ट्विस्ट आणि धक्कादायक खुलासे होत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. अपूर्वा मखीजाच्या ‘इन्फॉर्मर’ भूमिकेचा खुलासा हा देखील शोमधील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे.
रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाचंही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. ‘बिग बॉस मराठी’नंतर त्याने या शोमध्येही आपल्या सहज आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र त्याच्या एका संवादामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
रितेशने खरंच रवी किशन यांना टोला लगावला होता की हा फक्त एक साधा संवाद होता, याचे उत्तर सध्या कोणाकडेही नाही. मात्र या एका वाक्यामुळे ‘लॉक अप २’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून सोशल मीडियावर याबाबत चर्चा अजूनही सुरू आहे.





