विधिमंडळ अधिवशेनात रोहित पवार यांच्या टी-शर्टची चर्चा ,’फक्त मुद्द्याचं बोलूया…’
Updated On:

जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन केले होते.
कर्जतमध्ये एमआयडीसी यावी, यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आग्रही आहेत. मागच्या काही दिवसांपासून रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. आता अशातच रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. रोहित पवार यांनी आज हटके टी-शर्ट परिधान करत अधिवेशनाला हजेरी लावली. या टी-शर्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. रोहित पवार यांनी या बाबत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
रोहित पवार फेसबूक पोस्ट
माझ्या मतदारसंघातील MIDC सह सर्वच युवांसाठी महत्त्वाचा असलेला रोजगाराचा विषय अधिवेशनात लावून धरल्याने मतदारसंघाबाहेरच्या एका मित्राने हा टी-शर्ट भेट दिला. शिवाय
‘ध्येय विकासाचं ठेवूया
वेध भविष्याचा घेऊया
युवाशक्तीला संधी देऊया
आणि फक्त मुद्द्याचं बोलूया!
हा मनातला निश्चियही त्या टी-शर्टवर रेखाटत युवांच्या मुख्य प्रश्नांवरून ढळायचं नाही, हा मेसेज देण्याची त्याची कल्पना आवडल्याने आज हा टी-शर्ट घालूनच विधानभवनात प्रवेश केला…





