उत्तेजक द्रव्य सेवनात थाळीफेकपटू संदीपकुमारी दोषी
Updated On:

नवी दिल्ली – भारताची अव्वल थाळीफेकपटू संदीपकुमारी उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने तिच्यावर चार वर्षांची बंदी लावण्यात आली आहे. 2018 साली गुवाहाटीत झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य मैदानी स्पर्धेत संदीपकुमारीने 58.41 मीटर अंतर नोंदवताना सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी हेच नमुने परदेशातील प्रयोग शाळेत पाठवले असता तिने उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे उघड झाले.
तिने जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (वाडा) बंदी घातलेले मेटेनेलोनचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या चाचणीत उत्तेजक द्रव्याचे अंश सापडले नव्हते त्यामुळे तिचे नमुने मॉंट्रियलला पाठविण्यात आले व त्यात ती दोषी असल्याचे सिद्ध झाले





