nagar | श्रीगोंद्यात मतदारांमध्ये जाणवला निरुत्साह

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा मतदारसंघातील ३४५ मतदान केंद्रांवर सरासरी –% मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. मात्र, मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. शिवाय, अनेक मतदारांची नावे दुसऱ्या केंद्रांवर गेल्याने त्यांचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत ९.१२% इतकेच मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी जास्त घटण्याची भीती निर्माण झाली होती. अकरानंतर मतदारांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला.
उन्हाळ्याचा तडाखा अधिक असल्याने दुपारी जवळपास तीन तास मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. चारनंतर मतदान केंद्रांवर पुन्हा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीगोंदा शहर, बेलवंडी आदी केंद्रांवर सायंकाळी सहानंतर देखील मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
श्रीगोंदा मतदारसंघातील एकूण ३ लाख २८ हजार ९६६ मतदारांपैकी लाख हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ लाख ७२ हजार ०४३ पुरुष मतदारांपैकी लाख हजार मतदारांनी मतदान केले. त्याचबरोबर १ लाख ५६ हजार ९२० महिला मतदारांपैकी लाख हजार महिलांनी मतदान केल
दरम्यान, दोन्ही आघाड्यांकडून लोकसभा निवडणुक प्रतिष्ठेची झाल्यानंतर देखील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. बहुतांश ठिकाणी राजकीय कार्यकर्ते राबल्याने मतदानाचा आकडा समाधानकारक स्थितीत जाऊ शकला.
वांगदरीत मतदान केंद्राबाहेर गोंधळ!
तालुक्यातील वांगदरी येथील मासाळवाडी केंद्राबाहेर काही लोक पैसे वाटत असल्याच्या आरोपातून दोन गटांत जोरदार धक्काबुक्की झाली. “तुम्ही आम्हाला विकत घ्यायला आले का?” असे म्हणत ग्रामस्थांनी त्यांना पळवून लावल्याची माहिती समजली.
कांद्याची माळ घालून मतदान
तालुक्यातील टाकळी लोणार येथील शेतकरी सोमनाथ गोडसे, हुसेन शेख आणि संदीप कुनगर यांनी दूध आणि कांद्याला बाजार नसल्याने गळ्यात कांद्याची माळ आणि हातात दुधाची किटली घेऊन मतदान केले.
हंगेवाडीत मतदारांना ‘वृक्ष’भेट!
तालुक्यातील हंगेवाडी येथे गेल्यावेळी ५० टक्क्यांहून कमी मतदान झाले होते. यंदा ते वाढविण्यासाठी प्रत्येक मतदाराला वृक्ष भेट देण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राबविण्यात आला. यावेळी सुमारे ६५% मतदान झाले.





